मुंबई : चर्चगेट परिसरातील लाफ्युम कॅफेमध्ये अनधिकृत बांधकाम असून त्यावर कारवाई न करण्यासाठी महापालिकेच्या ए प्रभागात दुय्यम अभियंता म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने 3 लाख लाचेची मागणी केली. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंध विभागाने महापालिकेचा दुय्यम अभियंता सुनील भारांबे (वय 57) याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पाच लाखांची मागणी : लाच मागितल्या प्रकरणी 26 वर्ष तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंध विभागाला कळवले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए प्रभागात काम करणाऱ्या सुनील भारंबे यांनी कॅफेमधील अनाधिकृत बांधकामावरील कारवाई टाळण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पाच लाख लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडी अंति तीन लाख रुपये देण्याचे ठरले. लाचेची ठरलेली तीन लाख रुपये रक्कम स्वीकारताना एसीबीने परीक्षण विभागात काम करणाऱ्या दुय्यम अभियंता सुनील भारंबे याला ताब्यात घेतले. लाचेची मागणी 4 ते 6 मे दरम्यान करण्यात आली होती.
भारांबे पोलिसांच्या जाळ्यात : तक्रारदार हे लायझेनिंगचे काम करतात. तसेच त्यांच्या मित्रांचे चर्चगेट येथील महर्षी कर्वे रोडवर लाफ्युम कॅफे, हुक्का पार्लर आहे. तक्रारदार त्याच्या संपूर्ण नगरपालिका, सरकारशी संबंधित परवाना देण्याचे काम पाहतो. 26 एप्रिल रोजी महापालिकेच्या अ प्रभागातील दोन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना सुनील भारंबे यांना कार्यालयात येऊन भेटण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी यांनी त्यांना त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला. त्यांनी सांगीतल्याप्रमाणे 3 मेला झालेल्या भेटीतील संभाषणादरम्यान सुनील भारांबे यांनी तक्रारदार यांना लाफ्युम या कॅफेमध्ये असलेल्या पोटमळ्यासंबंधी तक्रार प्राप्त असुन कारवाई करावयाची नसल्यास प्रथम पाच लाख लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 3 लाख देण्याचे ठरले होते. तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्याने याप्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून 4 ते 6 मे दरम्यान एसीबीकडून पडतळणी करण्यात आली. नंतर 6 मे ला चर्चगेट स्टेशनच्या समोर तडजोडी अंती 2 लाख इतकी रक्कम लाच म्हणून भारांबे यांनी स्वीकारली. त्यावरुन कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये भारंबे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांचे नागरिकांना अव्हान : सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. अँन्टी करप्शन ब्युरो, बृहन्मंबई विभाग, सरपोचखानवाला रोड, वरळी, मुंबई.