ETV Bharat / state

Corona In Thane : ठाण्यात चिंता वाढली.. आयुक्त, पालकमंत्र्यांसह नेते कोरोनाच्या विळख्यात - MLA Pratap Saranaik

कोरोनाची लाट ओसारतेय असे वाटत असतानाच ओमायक्राॅन (Omicron Variant) आणि वाढत्या कोरोना मुळे (Rising corona) महाराष्ट्रात चिंता वाढत आहे.पालिकेचे आयुक्त डॉ विपीन शर्मा (Municipal Commissioner Dr. Vipin Sharma) हे कोरोना पॉजिटीव्ह झाल्यानंतर आता पालकमंत्री एकनाथ शिंदे, (Guardian Minister Eknath Shinde) खासदार राजन विचारे (MP Rajan Vichare) आणि आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Saranaik) हे देखील कोरोनाग्रस्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Korona Effect
कोरोनाचा विळखा
author img

By

Published : Jan 4, 2022, 8:11 PM IST

Updated : Jan 4, 2022, 8:35 PM IST

ठाणे: ओमायक्राॅन आणि कोरोनाच्या वाढत्या संख्ये मुळे देशासह महाराष्ट्रात चिंता वाढत आहे. कोरोना संक्रमितांची संख्या दरदिवशी कित्येक पटींनी वाढत अआहे. ठाण्यात ही संख्या 700 च्या पुढे गेली आहे. ठाण्यातील सर्वच बड्या नेत्यांना कोरोनाने ग्रासले असून दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे.

ठाणे पालिकेचे आयुक्त डॉ विपीन शर्मा हे कोरोना पॉजिटीव्ह झाल्यानंतर आता पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक हे देखील कोरोनाग्रस्त झाल्याने एकच खळबळ उडाली. शिवसेनेचे हे तीनही बडे नेते सध्या होम क्वारंटाईन असून त्यांची परिस्थिती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊन देखील या सर्वांना कोरोनाची बाधा झाल्याने या लसीच्या विश्वासाहारते बद्दल नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.

तीन बडे नेते क्वारंटाईन

देशात कोरोना ओसरत असतानाच विदेशातून दाखल झालेल्या 'ओमायक्रॉन' या नविन विषाणुमुळे धास्ती वाढली आहे. आता ठाण्यात कोरोनाची तिसरी लाट उसळली असून, नागरिकांसह राजकीय मंडळीनाही कोरोनाची बाधा झाल्याने चिंतेत भर पडली आहे. ठाणे पालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर आता जिल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि आमदार प्रताप सरनाईक हे देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. शिवसेनेचे हे तीनही बडे नेते सध्या होम क्वारंटाईन असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. आता या नेतेमंडळींच्या संपर्कात आलेल्या अनेकांना धास्ती वाटु लागली असून, सर्वजण कोविड टेस्ट करून घेत आहेत.

ठाण्यात रुग्णसंख्या वाढली

कोरोना प्रचंड वेगाने वाढत असतानाही लक्षणे न आढळणाऱ्या बहुतांश कोरोना बाधितांवर उपचार मात्र घरच्या घरीच होत आहेत. विशेष म्हणजे, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असुन गेल्या ५ दिवसात कोरोनामुळे एकही मृत्यु झालेला नसल्याचे समोर आले आहे. ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मंगळवारी कोरोना बाधितांची संख्या १३३२ इतकी होती. तर मागील ५ दिवसात ३०३८ इतके रुग्ण आढळले आहेत. स्वतः आयुक्त आणि पालकमंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने चिंता वाढली आहे. ठाण्यातील सर्वच बडे नेते कोरोनाने बाधित झाले असून, दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे.

तिप्पट ऑक्सिजन उपलब्धततेचे नियोजन

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत औषधांसह ऑक्सिजनअभावी कोविड रुग्णांना प्राण गमवावे लागल्याचा कटु अनुभव गाठीशी असल्याने, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. ठाणे जिल्ह्यात सुमारे २० हजार ३२६ बे़डस् असून त्यापैकी ९०४४ ऑक्सिजन बेडस् आहेत. तर, ६ हजार ३१८ सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी ९०० रुग्ण सीसीसीमध्ये, २४९ डीसीएचसीमध्ये, ४६४ रुग्ण डीसीएचमध्ये उपचार घेत आहेत. तर सुमारे ३ हजार ३९६ रुग्ण होम क्वारंटाईन असून, घरीच उपचार घेत आहेत. यातील ३४४ रुग्ण ऑक्सिजनवर असून, २६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. गतवर्षी २४ एप्रिल रोजी एकाच दिवशी सर्वाधिक ८३ हजार सक्रिय रुग्णसंख्या होती. तेव्हा २१९ मेट्रीक ऑक्सिजनची आवश्यकता होती. आता तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी याच्या तीनपट म्हणजे ६५७ मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्धतेसाठी नियोजन केले जात असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

Last Updated : Jan 4, 2022, 8:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.