ETV Bharat / state

Waghnakh in Maharashtra : शिवरायांची 'वाघनखे' आणण्यासाठी मुनगंटीवार सोमवारी ब्रिटनला होणार रवाना; तीन वर्षांसाठी करार - मुनगंटीवार वाघनख आणण्यासाठी ब्रिटनला

Mungantiwar To Britain To bring Waghnakh: छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करण्यासाठी वापरलेली 'वाघ नखे' (Waghnakh) भारतात आणण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर 3 वर्षांसाठी ते ब्रिटनमधून परत आणली जाणार आहेत. यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांनी रविवारी रात्री उशिरा (Waghnakh pave way back) ब्रिटनला रवाना होत असल्याचे सांगितले.

Mungantiwar To Britain To bring Waghnakh
सुधीर मुनगंटीवार
author img

By PTI

Published : Oct 1, 2023, 7:41 PM IST

मुंबई : Mungantiwar To Britain To bring Waghnakh : छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले पौराणिक 'वाघ नख' किंवा वाघाच्या पंजाचा खंजीर यूकेमधून तीन वर्षांसाठी महाराष्ट्रात परत आणले जाईल, असे राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी सांगितले. यासाठी राज्य सरकार आणि लंडनमधील व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय मंगळवारी सामंजस्य करार करणार आहेत. यासाठी मुनगंटीवार यांनी रविवारी रात्री उशिरा ब्रिटनला रवाना होत असल्याचे सांगितले.

आदित्य ठाकरेंना शंकाच : करारावर स्वाक्षरी केल्यानंतर लवकरच ‘वाघ नाख’ महाराष्ट्रात परत आणले जाण्याची शक्यता आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. शिवाजी महाराजांनी १६५९ मध्ये विजापूर सल्तनतचा सेनापती अफझलखान याला मारण्यासाठी 'वाघ नखा'चा वापर केला होता. युनायटेड किंगडममधील संग्रहालयातून आणले जाणारे 'वाघ नख' असा सवाल करत शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर वाद निर्माण केला आहे. भारतात आणण्यात येत असलेली वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत की त्या काळातील आहे, असा वाद आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे. यावरून सत्तापक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

नितेश राणेंची ठाकरेंवर टीका : भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. शिवरायांच्या वाघनखाबाबत संशय व्यक्त करणं म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि शिवरायांच्या कर्तृत्वाचा अपमान करणे आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत अशलाघ्य शब्दात टीका केली. तसेच आदित्य ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत का, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे : छत्रपती शिवरायांच्या वाघ नखांसाठी परदेशात जाणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनी वाघनखे नक्की शिवरायांनी वापरलेली आहेत का, याची तपासणी करावी असे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच सरकारी पैशाने परदेश वाऱ्या नेत्यांनी करू नयेत. मौज-मजा करण्यासाठी स्वतःचे पैसे वापरावेत, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

अभ्यासात 'ढ' असणारे आदित्य : या मुद्द्यावर बोलताना भाजपा नेते आमदार राम कदम म्हणाले की, अभ्यासात 'ढ' असणारे आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा धसका घेतला आहे. आमदार राम कदम म्हणाले, आदित्य अहो, जपानहून उद्योग मुंबई आणि महाराष्ट्रात आले. मराठी माणसाला नोकरी मिळाली तर तुम्हाला बघवत नाही का? तुम्ही मुंबईला डांबरी खड्डे असेलले रोड दिले आहेत. पण सिमेंट काँक्रेटचे रस्ते दिले नाहीत. दरवर्षी टेंडर काढून स्वतःचे घर भरता यावे म्हणून हे सर्व केले आहे.

वाघनखे ही छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचे प्रतिक : राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवरायांनी वापरलेली वाघनखे लंडनमधील संग्रहालयातून लवकरच महाराष्ट्रात येतील, असे जाहीर केले आहे. या संदर्भात चर्चा पूर्ण झाली आहे. येत्या तीन नोव्हेंबरला या संदर्भातील करार करण्यात येणार आहे. त्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार रविवारी लंडनकडे रवाना होणार आहेत. वाघनखे महाराष्ट्रात आणण्यासाठी हा करार अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. छत्रपती शिवरायांनी अफजल खान वधात वापरलेली वाघ नखे ही महाराष्ट्रातील जनतेची अस्मिता आहे. वाघनखे ही छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाचे प्रतिक आहे. त्यामुळे येत्या 16 नोव्हेंबरला ही वाघ नखे महाराष्ट्रात येतील, अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

हेही वाचा:

  1. Sanjay Mandalik Taunts Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंना स्वतःची नखं, वाघनखं वाटत असतील; संजय मंडलिक यांचा टोला
  2. Waghnakh contorversy: वाघनखांबाबत शंका उपस्थित केल्यानं आदित्य ठाकरेंवर भाजपा नेत्यांची कडाडून टीका, म्हणाले..
  3. Aaditya Thackeray On CM : मुख्यमंत्री फक्त सुट्टी घालवण्यासाठी विदेश दौऱ्यावर; आदित्य ठाकरेंची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.