ETV Bharat / state

Mumbai University Election Program : मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचं वेळापत्रक जाहिर, पाहा संपूर्ण वेळापत्रक

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 1:35 PM IST

Mumbai University Election Program : गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीचं वेळापत्रक आज सकाळी जाहीर करण्यात आलंय. यानुसार पुढील वर्षी एप्रिल महिन्यात ही निवडणूक होणार आहे.

Mumbai University Election Program
Mumbai University Election Program

सागर देवरे, याचिकाकर्ते वकील

मुंबई Mumbai University Election Program : मागील वर्षभरापासून मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक रखडली होती. ही निवडणूक लवकरच होणार आहे. कारण या सिनेट निवडणुकीचं वेळापत्रक आज जाहीर करण्यात आलंय. वेळापत्रकानुसार पुढील वर्षी एप्रिल महिन्यात ही निवडणूक होणार आहे. निवडणुकरिता 21 एप्रिल 2024 ला मतदान होईल, तर 21 एप्रिलला मतमोजणी होण्याची शक्यता आहे. आजपासून नव्या मतदारांची नोंदणी सुरू झाली आहे. 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या महिनाभराच्या काळात नव्या मतदारांची नोंदणी होणार आहे. त्यामुळं विद्यार्थी संघटनांनी या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलीय.

विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांकडून निवडणूकीची तयारी सुरु : मागील महिन्यातच ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार होती. मात्र मतदार प्रक्रियेमध्ये काही बेकायदेशीर गोष्टी झाल्याची तक्रार भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केली होती. त्यानंतर राज्य शासनानं निवडणुकीचा कार्यक्रम स्थगित करण्याचा आदेश दिला. त्यांनतर मुंबई विद्यापीठानं ऑगस्ट 2023 मध्येच निवडणूक स्थगित करण्याचं जाहीर केलं होतं. या स्थगितीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलं होतं. त्यानंतर सिनेट निवडणुकीसाठी समिती नेमण्यात आली. या समितीनं अहवाल सादर केल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी. यासाठी विद्यापीठानं वेळापत्रक जाहीर करावं, असे निर्देश न्यायालयानं दिलं होते. त्यानंतर आता मुंबई विद्यापीठानं या सिनेट निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर केलंय. त्यामुळं विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी या निवडणुकीची तयारी सुरू केलीय. त्यामुळं ही निवडणूक कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सिनेट निवडणुकांचं सुधारित वेळापत्रक :

  • 30 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत नव्याने मतदार नोंदणी करण्यात येईल.
  • 1 डिसेंबर 2023 ते 25 फेब्रुवारी 2024 या कालावधीत अर्ज छाननी, आक्षेप व मतदार यादी प्रसिद्धी करण्यात येईल.
  • 29 फेब्रुवारी 2024 निवडणूक अधिसूचना जाहीर करण्यात येणार आहे.
  • 11 मार्च 2024 रोजी उमेदवारी अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक असेल.
  • 18 मार्च 2024 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंबंधी लेखी कळविण्याची दिनांक
  • 20 मार्च 2024 रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • 21 एप्रिल 2024 रोजी सिनेट निवडणूक पार पडणार आहे.
  • 24 एप्रिल 2024 निवडणुकीची मतमोजणी पार पडणार आहे.

राजकीय दबावापोटी निवडणूक : मुंबई विद्यापीठाच्या एकूण दहा पैकी पाच जागा खुल्या प्रवर्गासाठी असून पाच जागा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि भटके विमुक्त जमाती यांच्यासाठी तसंच इतर मागासवर्गीय यांच्यासाठी असणार आहे. विद्यापीठानं जाहीर केलेल्या निवडणुकीवर याचिकाकर्ते वकील सागर देवरे यांनी म्हटलंय की, कोर्टाचा अवमान टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठानं आज सकाळी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. याआधी एक लाख मतदारांनी जी नोंदणी केली, ती रद्द करण्यात आली. नवीन मतदार नोंदणी करणं म्हणजे राजकीय दबावापोटी ही निवडणूक असल्याची टीका देखील याचिकाकर्ते सागर देवरे यांनी केलीय.

हेही वाचा :

  1. Mumbai University Election : सिनेट निवडणूक स्थगित; भाजपा आणि शिंदे गटाचा रडीचा डाव, विद्यार्थी संघटनांचा आरोप
  2. Law Exam : विधी विषयाची परीक्षा तोंडावर; अद्यापही हॉल तिकीट नाही, विद्यार्थी चिंतेत
  3. Mumbai University Senate Election: मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीची मोर्चेबांधणी; ठाकरे विरुद्ध ठाकरे लढत रंगणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.