मुंबई: सर्व उन्हाळी विशेष गाड्यांच्या वाढीव फेऱ्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग सुरू झाले आहे. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून बुकिंग करता येणार आहे. प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.
मुंबई- थिवि उन्हाळी विशेष (२० फेऱ्या) : 01045 लोकमान्य टिळक टर्मिनस - थिवि उन्हाळी विशेष ट्रेनला ६ मे २०२२ ते २४ मे २०२२ (१० फे-या) पर्यंत एक दिवसाआड चालविण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे. 01046 थिवि - लोकमान्य टिळक टर्मिनस उन्हाळी विशेष ट्रेनला ७ मे २०२२ ते २५ मे २०२२ (१० फे-या) पर्यंत एक दिवसाआड चालविण्याकरीता मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुंबई - मनमाड उन्हाळी विशेष (९२ फेऱ्या) : 02101 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई - मनमाड दैनिक विशेष ट्रेनला दि. १६ मे २०२२ ते ३० जून २०२२ (४६ फेऱ्या) पर्यंत चालविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 02102 मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई दैनिक विशेष ट्रेनला १६ मे २०२२ ते ३० जून २०२२ (४६ फेऱ्या) पर्यंत चालविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
हेही वाचा : Work of a Tunnel in Mumbai : कोस्टल रोडचा दुसऱ्या बोगद्याचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करू- आदित्य ठाकरे