ETV Bharat / state

Mumbai Rains: दुमजली बंगल्याचा काही भाग कोसळला, ढिगाऱ्याखालून काढलेल्या माय-लेकाचा उपचारादरम्यान मृत्यू - तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळला

घाटकोपर परिसरात असलेल्या राजवाडी रुग्णालय नजीक बंगलो रोडवर असलेल्या दुमजली बंगल्याचा काही भाग आज सकाळी खचला. बंगल्याच्या मातीच्या ढिगार्‍याखाली बंगल्यात राहणाऱ्या 94 वर्षीय अलका पालांडे आणि त्यांच्या मुलगा नरेश पालांडे हे दोघे अडकले. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. दोघांचीही सुटका करण्यात आली. मात्र उपचारानंतर दोघांचाही मृत्यू झाला आहे.

Mumbai Rains
Mumbai Rains
author img

By

Published : Jun 25, 2023, 1:07 PM IST

Updated : Jun 26, 2023, 7:48 AM IST

बंगल्याचा काही भाग कोसळला

मुंबई : मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसात मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांचे खूप हाल झाले. पहिल्याच पावसात अशी अवस्था झाल्यानं पुढे मुसळधार पावसात काय होणार? अशी काळजी मुंबईकर उपस्थित करत आहे. याचदरम्यान रविवारी सकाळी भीषण घटना घाटकोपरमध्ये घडली आहे. घाटकोपर परिसरात असलेल्या राजवाडी रुग्णालय नजीक बंगलो रोडवर बंगल्याचा काही भाग कोसळला आहे. या इमारतीत अडकलेल्या दोन जणांची सुटका करण्यात आली आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या माय-लेकाची सुटका करण्यात आली. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

  • #WATCH | Mumbai: Portion of a building collapsed in Rajawadi Colony, Ghatkopar (East). Rescue operation is underway.

    4 people have been safely rescued and 2 people are still trapped inside, rescue work is underway, says Maharastra Minister Mangal Prabhat Lodha https://t.co/itXjtrcn7Z pic.twitter.com/rLwA6qsNhp

    — ANI (@ANI) June 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दोन मजली बंगल्याचा भाग कोसळला : या अपघातात दोन जण अडकून पडले आहेत. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनडीआरएफने बचावकार्य केले. या दुर्घटनेत एकूण चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जखमींना नजिकच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे. राजावाडी रुग्णालय परिसरात असलेल्या दोन मजली बंगल्याचा काही भाग कोसळला. या घटनेत काही व्यक्ती अडकल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत 94 वर्षीय अलका पालांडे ही वृद्ध महिला आणि नरेश पालांडे हा एक पुरुष ढिगाऱ्याखाली अडकले. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल होत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

दोन जण ढिगाराखाली अडकले : अलका पालांडे यांचे नातेवाईक शरद पालांडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना माहिती दिली की, दुमजली बंगला असून खाली बेसमेंटमध्ये कार पार्किंगसाठी जागा होती. तीन कुटुंब या बंगल्यात राहत असून तळमजल्यावर राहत असणारे अलका आणि त्यांचा मुलगा नरेश पालांडे हे ढिगाराखाली अडकले आहेत. इतर पाच-सहा अडकलेल्या लोकांना बाहेर काढले असल्याची माहिती देखील शरद पालांडे यांनी पुढे दिली आहे.

मालकाविरोधात तक्रार करणार : एनडीआरएफचे जवान आणि अग्निशमन दलाचे जवान ढिगाराखाली अडकलेल्या अलका आणि नरेश यांना शोधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पालांडे कुटुंबीय या बंगल्यात भाडेतत्त्वावर राहतात. हा बंगला ठाण्यातील एका राजकीय व्यक्तीच्या मालकीचा असल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे घाटकोपर येथील राजावाडी हॉस्पिटल नजीक असलेल्या परिसरातील बरेच बांधकाम बेकायदेशीर असून गेली तीस वर्ष महापालिकेने ऑडिट केले नसल्याचे देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे पालांडे कुटुंबीयांचे नातेवाईक टिळक नगर पोलीस ठाण्यात बंगल्याच्या मालकाविरोधात तक्रार करणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.पहिल्याच पावसात मुंबईत इमारतीची दुर्घटना समोर आली आहे. इमारत दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, अधिकाऱ्याने सांगितले. या इमारतीत काही रहिवासी अद्याप अडकले आहेत.

तिसऱ्या मजल्यावरून दोन जणांची सुटका- जमिनीचा काही भाग तसेच इमारतींचे वरचे तीन मजले कोसळल्याने एकच गोंधळ उडाला आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोन लोक अडकले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तिसऱ्या मजल्यावरून दोन जणांची सुटका करण्यात आली आहेत. अडकलेल्या दोन जणांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. सुमारे ३० वर्षे वयाच्या एका पुरुषाची ढिगाऱ्याखालून सुटका करण्यात आली. त्याने रुग्णालयात जाण्यास नकार दिल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे.

दिवसभरात आणखी पाऊस पडण्याची शक्यता- मुंबई आणि उपनगरात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहनांच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. मान्सूनने दिल्ली आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी एकाचवेळी पोहोचला आहे. मुंबईत दिवसभरात आणखी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईत मुख्यमंत्र्यांनी अचानक केली पाहणी- दरवर्षी पहिल्या पावसात मुंबई महापालिकेच्या कामाची पोलखोल होते. यंदा मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती असताना शिंदे फडणवीस सरकारकडून मुंबईतील कामाबाबत काळजी घेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक सबवे येथे भेट देत पाहणी केली. चांगले काम केले नाही तर कारवाई करू, असा त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना इशारादेखील दिला आहे.

ठाण्यातही छत कोसळून तीन जखमी- मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात एका रेस्टॉरंटचे छत कोसळून तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी रात्री उशिरा घोडबंदर रोडवरील रेस्टॉरंटमध्ये घडल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाचे प्रमुख यासिन तडवी यांनी दिली. जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-

  1. Mumbai Rains: मुंबईतील मुसळधार पावसानंतर मुख्यमंत्र्यांची सबवे येथे अचानक भेट, अधिकाऱ्यांना दिला 'हा' इशारा
  2. Maharashtra Monsoon update : मुंबईसह राज्यात पावसाची दमदार हजेरी, पुढील 4-5 दिवसांत अतिवृष्टीचा अंदाज

Last Updated : Jun 26, 2023, 7:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.