ETV Bharat / state

मुंबईत १२ ऑक्टोबरला झालेला ब्लॅकआउट चीनमुळेच; सायबर हल्ला झाल्याचे उघड

१२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी अचानक मुंबईत वीज गेल्याने खळबळ माजली होती. तसेच रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर्स चालवण्यासाठी जनरेटरची मदत घ्यावी लागली होती. एवढेच नाही तर लोकल सेवा आणि शेअर मार्केटचे कामकाजही ठप्प झाले होते.

author img

By

Published : Mar 1, 2021, 3:31 PM IST

Updated : Mar 1, 2021, 4:01 PM IST

चीनचा मुंबईवर सायबर हल्ला
चीनचा मुंबईवर सायबर हल्ला

मुंबई- लॉकडाऊनच्या काळात १२ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईत अचानक वीज गेली होती. त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली होती. दक्षिण मुंबईसारख्या विभागात वीज गेल्याने अनेक महत्त्वाच्या कार्यालयांच्या कामांत अडचण निर्माण झाली होती. तसेच रुग्णालयातील महत्वाची कामे रखडली होती. मात्र, ही वीज काही तांत्रिक अडचणीमुळे गेली नसून, चीनने सायबर हल्ला केल्याची माहिती आता समोर येत आहे. हा हल्ला करण्यामागे नेमके काय कारण होते? याचा उलगडा गृहमंत्री अनिल देशमुख लवकरच करणार असल्याची माहिती उर्जामंत्री नितिन राऊत यांनी दिली.

घातपाताची शक्यता
वीज वितरित करणार्‍या कंपनीच्या ग्रीडमध्ये काही समस्या निर्माण झाल्याकारणाने वीज गेले असल्याचे स्पष्टीकरण त्यावेळी वीजमंडळ तसेच वीजवितरण कंपनीकडून देण्यात आले होते. मात्र, त्या वेळेसही राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज जाण्यामागे काही मोठा घातपात करण्यासंदर्भाची शंका उपस्थित केली होती.

दशकातील सर्वात मोठा वीज पुरवठा खंडीत

१२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी अचानक मुंबईत वीज गेल्याने खळबळ माजली होती. तसेच रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर चालवण्यासाठी जनरेटरची मदत घ्यावी लागली होती. एवढेच नाही तर लोकल सेवा आणि शेअर मार्केटचे कामकाजही ठप्प झाले होते. ही दशकातील सर्वात मोठा वीज पुरवठा खंडीत झाल्याची घटना होती. २ तासाच्या अथक प्रयत्नानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला होता.

हेही वाचा- अंधेरी कोर्टाकडून कंगना रणौत विरोधात वॉरंट जारी

हेही वाचा- बारा आमदारांच्या पत्रावर राज्यपालांनी सही केल्यानंतर विदर्भ-मराठवाडा वैधानिक विकास मंडळ तयार करू - उपमुख्यमंत्री

Last Updated : Mar 1, 2021, 4:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.