ETV Bharat / state

BMC : महानगरपालिका मुंबईतील प्रदूषण कसे कमी करणार?, वाचा खास रिपोर्ट - Air pollution in Mumbai

मुंबईत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. जागतिक प्रदूषण असलेल्या शहरात मुंबईचा क्रमांक वरचा आहे. यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार होत आहेत. यावर उपाय म्हणून मुंबई पालिकेने स्वच्छ हवा उपक्रमाअंतर्गत सात योजनांची घोषणा केली आहे. प्रदूषण केंद्रीकरण पातळीवर ठेवणे, बहूस्तरित देखरेख सुरू करणे, तसेच प्रदूषणामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी नियोजनाचे विकेंद्रीकरण करणे आणि नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

महानगरपालिका मुंबईतील प्रदूषण कसे कमी करणार

author img

By

Published : Feb 19, 2023, 7:24 PM IST

मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणात काम सुरू असतात. त्यामध्ये बांधकाम आणि निष्कासन याचा कचरा मोठ्या प्रमाणात असतो. बांधकामाच्या ठिकाणची धूळ कमी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत. त्यात इमारतीच्या बाह्य भागात धुळरोधक पडदे लावणे, धुळरोधक पडद्यावर व तळ मजल्यावर मोकळ्या जागेत पाणी शिंपडने, वाहनांची चाके धुणे, वाहनांची चाके धुणे, डेब्रिज पासून सुरक्षेसाठी जाळी बसवणे, बांधकामाचा कचरा प्रक्रिया करण्यासाठी ६०० टन प्रतिदिन क्षमतेचे २ प्रकल्प उभारले जाणार आहेत, आय ओ डी देताना जी आय पडदे उभारणे, आर एम सी प्लांट साठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक करण्यात आले आहे.

वायू शुद्धीकरण प्रणाली कार्यान्वित केली जाणार : गेल्या दशकात एकूण प्रदूषणात रस्त्यावरील धुळीचा वाटा दुपटीहून अधिक वाढला आहे. रस्ते बांधणी सामग्री, खडी, काँक्रिट यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी यांत्रिकी ई पॉवर स्वीपरचा वापर करणे, रस्ते आणि पदपथांवरील धुळीस अटकाव करण्यासाठी स्प्रिंकलर खरेदी करणे, मिस्टिंग उपकरणे कार्यान्वित करणे, वायु शुद्धीकरण युनिट कार्यान्वयित करणे, धूळ कमी करण्यासाठी वायू शुद्धीकरण प्रणाली कार्यान्वित करणे या उपाययोजना केल्या जाणार आहेत.

रस्त्यावर या केल्या जाणार उपाययोजना : वाहनांच्या वापरात झालेल्या प्रचंड वायू वाढीमुळे वायू प्रदूषणाचे रस्ते वाहतुकीचा मोठा वाटा आहे मुंबई शहरात नागरिकांचा खाजगी वाहतूक कडे कल कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक मागणी व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे खाजगी वाहन ऐवजी सार्वजनिक आणि शेअर वाहनांचा वापर करणे जीवाश्म इंधनावर चालणारे वाहनांचा वापर कमी करून पर्यावरण स्नेही पर्यायांची मागणी वाढवण्याकडे लक्ष दिले जाणार आहे यासाठी बेस्टकडून 3000 इलेक्ट्रिकल बसेस खरेदी करण्यात येत आहेत मालिकेच्या जुन्या डिझेल आणि पेट्रोल वाहनांचे सीएनजी वाहनांमध्ये रूपांतर केले जाते 258 वाहतूक नाक्यावर पूर्णपणे वाहतूक अनुकूल नियंत्रण प्रणाली यापूर्वीच कार्यरत करण्यात आली आहे या प्रणालीचे दर जुन्नती करण्यात येणार आहे वाहतूक प्रवाह व प्रदूषणावरील परिणामाचा अभ्यास करून 395 वाहतूक नाक्यावर सदर प्रणाली बसवण्यात येणार आहे.

कचरा प्रक्रिया केंद्र उभारली जाणार : कचरा जाळल्यामुळे आणि अयोग्य पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावल्यामुळे धूळीकणांच्या उत्सर्जन वायू प्रदूषणात भर पडते. यासाठी घरोघरी कचरा वर्गीकरणासाठी नागरिकांची संवाद साधून जागृती निर्माण केली जाणार आहे. कचरा जाळण्यावर देखरेख व बंदीची अंमलबजावणी केली जाणार आहे. देवनार क्षेपणभूमी येथे 600 टन प्रतिदिन क्षमतेचा वेस्ट एनर्जी प्रकल्प प्रगतीपथावर आहे. देवनार क्षेपणभूमी येथे पूर्वापर असलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग केले जाणार आहे. आठ ठिकाणी चार टन प्रतिदिन क्षमतेच्या घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्राची उभारणी केली जाणार आहे.

शहरी हरीत प्रकल्प : मुंबईत १ लाख झाडे लावली जाणार आहेत. मरोळ इंडस्ट्रीज असोसिएशन अर्बन फॉरेस्ट मिठी नदीच्या बाजूला झाडे लावली जाणार आहेत. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उद्यानात ४५००, महाकाली केव्हज अर्बन फॉरेस्ट येथे ३० हजार, स्वामी विवेकानंद उद्यान येथे ९ हजार, मरोळ भारत वन उद्यान येथे ६ हजार झाडे लावली जाणार आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून ग्रीन बफर तयार केले जाणार आहे.

हवामान अर्थसंकल्पाचा पथदर्शक प्रकल्प : स्वच्छ हवा कृती योजनेच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने हवामान अर्थसंकल्पाचा पथदर्शक प्रकल्प हाती घेतला आहे. पाच वातावरण वायु गुणवत्ता देखरेख केंद्राची उभारणी केली जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, निरी, आयआयटी आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहाय्याने राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत उत्सर्जनाचे विभाग स्तरावर मोजमाप केले जाणार आहे. शहराची कृती योजना प्रभावी करण्यासाठी हायपर लोकल मॉनिटरिंग सुरू केली जाणार आहे, वायु प्रदूषणाची निगडित संस्थाची हवा समन्वय समिती तयार करून मासिक बैठका घेतल्या जाणार आहेत. तेल शुद्धीकरण कारखाने, वीज प्रकल्प व इतर प्रदूषण निर्माण करणाऱ्या कंपन्यांशी समन्वय साधण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे.

संपर्क, जागरूकता मोहिमा : वायू प्रदूषणाबाबत जनजागृती मोहीम राबवण्यासाठी प्रसारमाध्यमांची मदत घेतली जाणार आहे, शाळा महाविद्यालयांमध्ये पर्यावरणपूरक इको क्लब तयार केले जाणार आहेत. पर्यावरण संवर्धन आणि वृद्धीसाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. रस्त्यावरील धूळ चांगल्या पद्धतीने साफ करण्याकरिता स्वच्छता कामगारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. शहरातील हवेची गुणवत्ता ज्या दिवशी बिघडेल तेव्हा नागरिकांना आरोग्य विभागाद्वारे सूचना जारी केली जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

पालिकेने गंभीर होण्याची गरज : मुंबई पालिका एक संकट उभे करून त्यामधून पैसे कसे उभे करता येईल, अशी कामे करत असते. प्रदूषणाबाबत बघितल्यास मुंबईत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. मुंबईत सर्व रस्ते एकत्र खोदले आहेत. रस्त्यावर धूळ आणि मातीचे ढिगारे दिसत आहेत. ट्रॅफिकचीही समस्या निर्माण होऊन प्रदूषणात वाढ होत आहे. नागरिकांना यामुळे श्वसनाचे आजार होत आहेत. पालिकेने समुद्रात वाहून चाललेले सांडपाणी रस्त्यावर आणि बांधकामाच्या ठिकाणी फवारले पाहिजे. मात्र, पालिका खर्च करून पाणी फवारणार आहे. नागरिकांना दिशाभूल करून पैसे खर्च करत राहायचे काम पालिका करत असते. बेसिक काम केले तरी प्रदूषण थांबू शकते.

कचऱ्याचे वर्गीकरण केले तर खर्च कमी : प्रदूषण रोखण्याचे काम प्रदूषण विभागाचे आहे ते कारवाई करत नाही म्हणून, प्रदूषण वाढते. झाडाचे फांद्या छाटल्या मग धूळ जाऊन बसणार कुठे हे थांबले पाहिजे. कांजूरमार्ग येथे कचरा डेपो येथून मिथेन सारखे गॅस निर्माण होतात. कचऱ्याचे वर्गीकरण केले तर खर्च कमी होणार आहे. अशी प्रतिक्रिया वनशक्ती संस्थेचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी दिली.

हेही वाचा : Shiv Jayanti : सरकार गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम करेल -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.