ETV Bharat / state

दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबई लोकल, लोकलमध्ये विषारी गॅस सोडण्याचा होता कट

दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली. यातील एक दहशतवादी जान मोहम्मद शेख याचा थेट संबंध मुंबईशी होता. या दहशतवाद्यांकडून आता चौकशीमध्ये मोठे खुलासे होत असून दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबई असल्याचे समोर आले आहे.

mumbai terrorists news
mumbai terrorists news
author img

By

Published : Sep 18, 2021, 1:13 PM IST

मुंबई - 14 सप्टेंबरला दिल्ली पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली. यातील एक दहशतवादी जान मोहम्मद शेख याचा थेट संबंध मुंबईशी होता. जान मोहम्मद शेख हा मुंबईतील धारावी परिसरामधील रहिवासी आहे. या दहशतवाद्यांकडून आता चौकशीमध्ये मोठे खुलासे होत असून दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबई असल्याचे समोर आले आहे. मुंबईत मोठा घातपात घडवण्याचा कट दहशतवाद्यांच्या चौकशीतून समोर आले. खास करून या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुंबई लोकल असल्याची माहिती तपास यंत्रणेला मिळाली आहे.

रेल्वे प्रशासन अलर्ट -

मुंबई लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. गर्दी असलेल्या वेळी मुंबईच्या लोकलमध्ये विषारी गॅस सोडून अधिकाधिक लोकांना मारण्याचा कट दहशतवाद्यांकडून रचला जात होता. या कटासाठी काही स्टेशनची रेकी केली गेली होती का? याबाबत देखील आता तपास यंत्रणा कसून चौकशी करत आहेत. गुप्तचर विभागाकडून याबाबत रेल्वे प्रशासनाला अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यानंतर मुंबईतील अनेक स्टेशनवर आता सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आल्या आहेत. तसेच मुंबईमधील महत्त्वाच्या स्टेशनवर आत आणि बाहेर जाणाऱ्या मार्गांवर सुरक्षाव्यवस्था रेल्वे प्रशासनाकडून वाढवण्यात आल्या आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या सुरक्षा संदर्भात बैठक -

14 सप्टेंबरला सहा दहशतवाद्यांना पकडल्यानंतर या दहशतवाद्यांच्या रडारवर मुंबई लोकल असल्याचे कळतात 15 सप्टेंबरला रेल्वे अधिकार्‍यांनी बैठक बोलावली होती. या बैठकीत मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूच्या परिसराचे सुरक्षेत वाढ करण्याचे निर्देश या अधिकाऱ्यांनी दिले. तसेच रेल्वे परिसरात महत्त्वाच्या जागी सर्वांकडून तपासणी करणे, बॉम्बशोधक पथके, तसेच स्थानकावरील हमाल व बूटपॉलिश करणाऱ्या लोकांना संशयास्पद वस्तू आढळल्यास किंवा हालचाली आढळल्यास स्टेशन मास्तरांना याबाबत कळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - एटीएसची कारवाई : झाकीरने जानला दिला होता स्फोटकांची डिलिव्हरी घेण्याचा टास्क

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.