मुंबई - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकी आणि खंडणी वसुलीचा प्रयत्न प्रकरणात आरोपी अनिल जयसिंघानीला जामीन मिळाला नाही. मुंबई उच्च न्यायालयाने त्याबाबत न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठाने निकाल राखून ठेवला आहे. तर अतिरिक्त सत्र न्यायालयातील सुनावणीमध्ये अनिल जयसिंगाचाचा ताबा मध्य प्रदेश पोलिसांकडे देण्याच्या मागणीला सत्र न्यायालयाने मंजुरी दिली. त्यामुळे आता मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात अनिल जयसिंगानी गेला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याच्या प्रकरणी आणि त्यांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी दहा कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप असलेला अनिल जयसिंगाने याने त्याला केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला होता. अनिल जयसिंघानी याने त्याच्या याचिकेमध्ये असे म्हटले होते की, त्याला जी अटक झालेली आहे ती बेकायदेशीर आहे. म्हणून त्याला जामीन मिळावा. मात्र त्याबाबत सरकारी पक्षाच्या वकिलांनी जी बाजू मांडली, त्यामध्ये अनिल जयसिंगानी याची अटक कायदेशीर असल्याचे म्हटले होते. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने तो निकाल राखून ठेवलाय. मात्र या संदर्भात सत्र न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली. त्यात मात्र मध्य प्रदेश पोलिसांच्या एन्ट्रीमुळे प्रकरण किती खोलवर आहे याची कल्पना सहज येते.
सत्र न्यायालयाच्या झालेला सुनावणीमध्ये अनिल जयसिंघानीने याबाबत देखील सरकारी पक्षाच्या वतीने वकील अजय मिसर यांनी मुद्दे मांडले की, अनिल जयसिंघानी गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे आहेत. त्यामुळे त्याचे चरित्र पाहता त्याच्या चौकशीसाठी त्याला जामीन मिळू नये. तर अनिल जयसिंघानी याच्या वकिलांनी सत्र न्यायालयामध्ये हा मुद्दा मांडला की, अनिल जयसिंघानी याच्यावर एकही दोषारोप सिद्ध झालेला नाही. सबब त्याला अटकपूर्व जामीन मिळावा. मात्र या सुनावणीदरम्यान मध्यप्रदेश पोलीस सत्र न्यायालयाच्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी याच प्रकरणासंदर्भात अनिल जयसिंघानी याची पोलीस कोठडी मागण्याचा अर्ज केला. अखेर सत्र न्यायालयाने अनिल जयसिंघानीचा ताबा मध्य प्रदेश पोलिसांकडे दिला.
मध्यप्रदेश पोलिसांच्या वतीने अनिल जयसिंघानी याच्यावर असलेले विविध गुन्हे त्याप्रकरणी चौकशी करण्यासंदर्भात मध्यप्रदेश पोलिसांकडे ताबा असावा; असे म्हटले होते. मुंबई अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक अलमाले यांनी अनिल जयसिंग आणि याचा ताबा अखेर मध्य प्रदेश पोलिसांकडे दिला.
Anil Jaisinghani Case : बुकी अनिल जयसिंघानीला जामीन नाही, उच्च न्यायालयाने निकाल ठेवला राखून, मध्यप्रदेश पोलिसांच्या केले स्वाधीन - अटकपूर्व जामीन मिळावा
अमृता फडणवीस प्रकरणातील आरोपी जयसिंघानीच्या अडचणी आणखी वाढणार असे दिसत आहे. त्याला आज कोर्टाने जामीन दिलाच नाही. एवढेच नाही तर त्याची रवानगी मध्यप्रदेश पोलिसांकडे करण्यात आली. विविध प्रकरणामध्ये तो मध्यप्रदेश पोलिसांना चौकशीसाठी हवा होता.