मुंबई : मुंबईतील कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या 29 वर्षीय पीडित महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन लैंगिक शोषण (Call center girl sexual abuse) केल्या प्रकरणात कॉल सेंटरमधील मॅनेजरवर बलाकाराचा गुन्हा दाखल (rape case against call center manager) करण्यात आला होता. या प्रकरणात आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी (rape case accused bailed) धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करत पीडित महिलेला आरोपी पासून झालेल्या मुलीच्या संगोपनासाठी (bear expenses of rape victim daughter) 10 लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते. आरोपीने रक्कम जमा केल्यानंतर आरोपीला जामीन उच्च न्यायालयाने मंजूर (Mumbai HC grants bail rapist accused) केला आहे.
न्यायालयाचे निरीक्षण- पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यामध्ये कॉल सेंटरमध्ये काम करत असताना एकमेकांची ओळख झाली होती. पीडित तरुणी कॉल सेंटरमध्ये आरोपीच्या अंडर टीम मॅनेजर म्हणून काम करत होती. दोघांमध्ये प्रेम संबंध झाल्यानंतर आरोपीने लग्नाचे खोटे आश्वासन देऊन महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले होते. यामध्ये आरोपीपासून महिलेला गर्भधारणा देखील झाली होती. यामध्ये महिलेने एका मुलीला जन्म दिला आहे. न्यायालयाने आपल्या निकालात असे म्हटले आहे की, पीडित 29 वर्षीय तरुणी तरुणासोबत असलेले संबंधाचा परिणाम काय होणार हाेते माहीत होते. तरीदेखील आरोपीसोबत तरुणीने संबंध सुरू ठेवले होते; त्यामुळे आरोपीला पूर्णपणे दोषी ठरू शकत नाही, असे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे.
या अटीवर जामीन मंजूर- कोर्टाने पुढे नमूद केले की लग्नाच्या खोट्या सबबीखाली शारीरिक संबंध ठेवल्याचा कोणताही आरोप नसल्याने आणि आरोपीने मुलाच्या वडिलांच्या जबाबदारीसाठी 10 लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे तो जामिनावर सुटण्यास पात्र आहे, असे न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने निकालात म्हटले आहे. आरोपीच्या वतीने वकील अनिल लल्ला यांनी सांगितले की दोघांमधील संबंध सहमतीने होते. मार्च 2021 पासून शारीरिक कृत्ये सुरू होती तरीही पीडितेने ऑगस्ट 2021 मध्ये तक्रार दाखल केली होती. तिने खुलासा केला की, ती गरोदर होती. त्याच्या क्लायंटने तिला गर्भपात करण्यासाठी रक्कम देऊ केली होती.
पीडितेला कामावरून काढून टाकण्याची धमकी- तक्रारीनुसार महिलेने कॉल सेंटरमध्ये टीम लीडर म्हणून नोकरी स्वीकारली असून आरोपी तिचा बॉस होता. आरोपीने पीडित तरुणीला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आरोपीने पीडित तरुणीला वेगवेगळ्या तारखांना हॉटेलमध्ये नेऊन आरोपींनी तिचे लैंगिक शोषण केले आणि नंतर ती गरोदर राहिल्यावर त्याने तिला गर्भपात करण्यासाठी पैसेही पाठवले. कोणालाही त्यांचे संबंध उघड करू नका, असा इशारा दिला. त्यानंतर पीडित तरुणीने तक्रार दाखल केली. त्या आरोपीला सप्टेंबर 2021मध्ये अटक करण्यात आली होती. सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.
पीडितेच्या वकिलाचा जामीन अर्जास होता विरोध - राज्याचे अतिरिक्त सरकारी वकील एस एच यादव पीडितेचे वकील अजिंक्य उडाणे यांनी सुरुवातीला अर्जाला विरोध केला होता; कारण आरोपीने आपल्या पदाचा गैरफायदा घेत आपल्या सहकारी असलेल्या तरुणीचा लैंगिक शोषण केले होते, हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे त्याला जामीन देऊ नये. जेव्हा आरोपीच्या वकिलाने खंडपीठाला सांगितले की DNA चाचणीच्या निकालाची प्रतीक्षा असली तरी त्याचा क्लायंट मुलाच्या संगोपनासाठी 10 लाख रुपये देण्यास तयार आहे. त्यानंतर उदाणे यांनी असे सादर केले की, रक्कम स्वीकारणे केवळ या आधारावरच असेल की, ती महिला नंतर स्वत:साठी आणि मुलाच्या देखभालीचा दावा करू शकते. याा खंडपीठाने सहमती दर्शविली.