ETV Bharat / state

अग्निशमन दलाचा फायर 'रोबोट' पहिल्याच परिक्षेत ठरला 'फेल' - आदित्य ठाकरे

मुंबईमधील चिंचोळ्या गल्ल्या, उत्तुंग इमारतीत आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान जखमी होतात म्हणून एक कोटी रुपये खर्च करून फायर रोबोट घेण्यात आला. या रोबोटची यशस्वी चाचणी नुकतीच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. हा रोबोट अग्निशमन दलात आल्याने आग विझवणे सोपे होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ती आपेक्षा फोल ठरली आहे.

अग्निशमन दलाचा फायर 'रोबोट' पहिल्याच परिक्षेत ठरला 'फेल'
author img

By

Published : Jul 23, 2019, 6:04 AM IST

Updated : Jul 23, 2019, 1:50 PM IST

मुंबई - सुमारे एक कोटी रुपये खर्चून अग्निशमन दलात मोठा गाजावाजा करत आणलेला फायर रोबोट पहिल्याच परिक्षेत फेल ठरला आहे. हा फायर रोबोट वांद्रे येथील एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीत पहिल्यांदाच वापरण्यात आला. मात्र, रोबोट शिड्यांवरून वर इमारतीमध्ये जाऊ शकला नाही. यामुळे रोबोटचा प्रयोग फसला आहे.

मुंबईमधील चिंचोळ्या गल्ल्या, उत्तुंग इमारतीत आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान जखमी होतात म्हणून एक कोटी रुपये खर्च करून फायर रोबोट घेण्यात आला. या रोबोटची यशस्वी चाचणी नुकतीच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. हा रोबोट अग्निशमन दलात आल्याने आग विझवणे सोपे होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ती आपेक्षा फोल ठरली आहे.

अग्निशमन दलाचा फायर 'रोबोट' पहिल्याच परिक्षेत ठरला 'फेल'

आज वांद्रे येथील एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीमध्ये पहिल्यांदाच हा रोबोट वापरण्यात आला. यामुळे रोबोट कसे आगीवर नियंत्रण मिळवतो याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र हा रोबोट शिड्यावर चढू शकला नाही. याकरणाने रोबोटचा प्रयोग अपयशी ठरला. याबाबत मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदले यांच्याशी संपर्क साधला असता, रोबोट इमारतीच्या एका बाजूच्या शिड्यांवर चढू शकला नाही हे मान्य करत इमारतीच्या दुसऱ्या बाजूला आम्ही रोबोटचा वापर केल्याचे सांगितले.

वायर, केबलमुळे आग भडकली -
एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीत वायर आणि ऑप्टिकल फायबर केबल्समुळे भडकली. ही आग प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटने लागल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदले यांनी सांगितले. आम्ही 70 लोकांना बाहेर काढले असून एमटीएनलकडून आपले सर्व कर्मचारी बाहेर आल्याची माहिती दिल्याचे रहांगदले यांनी सांगितले. आगीत अडकलेली लोक सर्व बाहेर काढली असली तरी शोध मोहीम सुरू असल्याचे रहांगदले यांनी सांगितले.

Intro:मुंबई
मुंबई अग्निशमन दलात मोठा गाजावाजा करत आणलेला फायर पहिल्याच परिक्षेत फेल ठरला आहे. अग्निशमन दलात आणलेला फायर रोबोट वांद्रे येथील एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीत पहिल्यांदाच वापरण्यात आला. मात्र हा रोबोट शिड्यांवरून वर इमारतीमध्ये जाऊ न शकल्याने याचा प्रयोग फेल झाला आहे.Body:मुंबईमधील चिंचोळ्या गल्या, उत्तुंग इमारतीत आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान जखमी होतात म्हणून एक कोटी रुपये खर्च करून फायर रोबोट घेण्यात आला. या रोबोटची यशस्वी चाचणी नुकतीच शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. हा रोबोट अग्निशमन दलात आल्याने आग विझवणे सोपे होईल अशी अपेक्षा होती.

आज वांद्रे येथील एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीमध्ये पहिल्यांदाच हा रोबोट वापरण्यात आला. यामुळे रोबोट आग कसा बुजवतो याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र हा रोबोट शिड्यांवर चढू शकलेला नाही. याकरणाने रोबोटचा प्रयोग अपयशी ठरला आहे. याबाबत मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदले यांच्याशी संपर्क साधला असता, रोबोट इमारतीच्या एका बाजूच्या शिड्यांवर चढू शकला नाही हे मान्य करत इमारतीच्या दुसऱ्या बाजूला आम्ही रोबोटचा वापर केल्याचे सांगितले.

वायर, केबल्समुळे आग भडकली -
एमटीएनएल इमारतीला लागलेल्या आगीत वायर आणि ऑप्टिकल फायबर केबल्समुळे भडकली. ही आग प्राथमिक माहितीनुसार शॉर्टसर्किटने लागल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदले यांनी सांगितले. आम्ही 70 लोकांना बाहेर काढले असून एमटीएनलकडून आपले सर्व कर्मचारी बाहेर आल्याची माहिती दिल्याचे रहांगदले यांनी सांगितले. आगीत अडकलेली लोक सर्व बाहेर काढली असली तरी शोध मोहीम सुरू असल्याचे रहांगदले यांनी सांगितले.Conclusion:
Last Updated : Jul 23, 2019, 1:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.