मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले होते. मागील महिन्यात दिवसाला ७० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. आज (14 जून) धारावीत एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. यापूर्वी 3 जून रोजी धारावीत केवळ १ रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे धारावीकरांनी दुसऱ्यांदा कोरोनावर मात केल्याचे समोर आले आहे.
धारावीत 6 वेळा शून्य रुग्ण
जुलै, ऑगस्टनंतर धारावीतील दोन अंकी असलेली रुग्णसंख्या आणि सक्रिय रुग्णसंख्या एक अंकावर आली होती. २४ डिसेंबर, २२ जानेवारी, २६ जानेवारी, २७ जानेवारी, ३१ जानेवारी, २ फेब्रुबारी या 6 दिवशी धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली.
आज सातव्यांदा धारावीत शून्य कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. दरम्यान, धारावीकरांनी शासन-प्रशासनाच्या मदतीने करून दाखवले आहे. त्यामुळे धारावी पॅटर्नची सर्वत्र चर्चा होत आहे.
हेही वाचा - राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता संचारी विजयचा अपघाती मृत्यू, कुटूंबियांनी अवयवदानाची केली घोषणा