ETV Bharat / state

यूट्यूबवरील व्हिडिओ लाईक करण्याचं काम, टास्क पूर्ण करताच 55.35 लाखांची फसवणूक - दक्षिण सायबर सेल

Mumbai Cyber Crime : सायबर फसवणूक प्रकरणी दक्षिण मुंबई सायबर सेलने दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये वकील असलेल्या एका महिलेचा समावेश आहे. दोन्ही आरोपींनी मिळून एका महिलेला यूट्यूबवरील लिंक लाईक करण्याचं काम देऊन तिची 55.35 लाख रुपयांची फसवणूक केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

mumbai cyber crime 55.35 lakh fraud after completing the task of liking videos on YouTube two accused were arrested
यूट्यूबवरील व्हिडिओ लाईक करण्याचं काम, टास्क पूर्ण करताच 55.35 लाखांची फसवणूक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 1, 2024, 11:40 AM IST

मुंबई Mumbai Cyber Crime : दक्षिण सायबर सेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेमांगी झुनझुनवाला (वय 47) हिनं तक्रार दाखल केली होती की, आर्या नावाच्या मुलीनं तिला व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज पाठवून यूट्यूबवर व्हिडिओ लाईक करण्याच्या अर्धवेळ नोकरीची ऑफर दिली होती. ही ऑफर स्वीकारून झुनझुनवालानं व्हिडिओ लाईक करण्याचं काम सुरू केलं. सुरुवातीला यासाठी तिला पैसे दिले गेले. त्यानंतर सायबर फसवणूक करणाऱ्यांनी तिला फी आकारून टास्क ऑफर करून एकूण 55.35 लाख रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यास सांगितल्याची माहिती पोलीस उपायुक्त राज तिलक रोशन यांनी दिलीय.

सायबर सेलचा तपास सुरू : फसवणूक झाल्याचं लक्षात येताच हेमांगी झुनझुनवाला यांनी सायबर सेलकडे याप्रकरणाची तक्रार नोंदवली. त्यानंतर दक्षिण सायबर सेलनं तपास केला असता झुनझुनवालानं ट्रान्सफर केलेल्या 55.35 लाख रुपयांपैकी 14.50 लाख रुपये नागपुरातील बँक खात्यात जमा झाल्याचं समोर आलं. हे बँक खाते 'कांचन जनरल स्टोअर आणि होलसेलर' यांच्या नावावर होतं. त्यानंतर पोलिसांनी नागपुरला जात बँकेतील खातेदार कांचन मेश्राम यांची चौकशी केली. तेव्हा कांचन मेश्रामची मैत्रिण सलमा अली हिनं मेश्रामच्या कागदपत्रांचा वापर करून बँकेत खातं उघडल्याचं उघड झालं. चौकशीदरम्यान कांचन मेश्राम यांनी सांगितलं की, सलमा अलीनं माझ्या कागदपत्रांचा वापर करून बँक खातं उघडलं. त्याचा वापर लोकांना फसवण्यासाठी केला.

बँक खात्यात तीन कोटी रुपये जमा : आपल्या कागदपत्रांचा वापर चुकीच्या कामांसाठी करण्यात आल्याचं लक्षात येताच कांचन मेश्राम यांनी 15 ऑक्टोबरला सलमा सुजात अली (वय 38) आणि गजेंद्र एकुणकर (वय 39) यांच्याविरोधात नागपुरातील पार्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसंच पोलिसांनी या बँक खात्याची माहिती घेतली असता दोन दिवसात तब्बल तीन कोटी रुपये यात जमा झाल्याचं समोर आलं.

सलमा अलीच्या बँक खात्यात पैसे आहेत. मात्र त्यांचा या फसवणुकीशी कोणताही संबंध नाही- युसूफ अन्सारी, आरोपींचे वकील

बँक खातं गोठवलं : यासंदर्भात अधिक माहिती देत सायबर सेलच्या पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, हेमांगी झुनझुनवाला यांनी फसवणुकीची तक्रार केल्यानंतर त्याप्रकरणी तपास केला असता एका बँक खात्यात जास्तीत जास्त रक्कम ट्रान्सफर झाल्याचं समोर आलं. त्यानंतर ते बँक खातं गोठवण्यात आलं. तसंच आरोपी सलमा अली आणि तिचा सहकारी गजेंद्र एकुणकर यांना पोलिसांनी अटक करून नागपूर येथून मुंबईत आणलं. त्यानंतर दोघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली.

हेही वाचा -

  1. Cyber Crime : सेक्सटॉर्शननंतर सायबर चोरट्यांच्या रडारवर राजकीय व्यक्ती; धमक्यांचे प्रमाण वाढले
  2. Mumbai Cyber crime : मुंबई सायबर गुन्हे शाखेने ऑनलाइन फसवणुकीच्या रॅकेटचा केला पर्दाफाश
  3. Mumbai Cyber Crime : प्रलोभनाने भुलवून ओढतात सायबर क्राईमच्या विळख्यात, लॉकडाऊन नंतर नोकरी फसवणुकीच्या प्रमाणात वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.