ETV Bharat / state

सोशल मीडियावर मॉर्फ करून आक्षेपार्ह पोस्ट केले फोटो, पंजाबी अभिनेत्रीच्या ऑनलाईन तक्रारीनंतर गुन्हा दाखल - morphing photos

सोशल मीडियावरील फोटो घेऊन ते मॉर्फ केल्याप्रकरणी पंजाबी अभिनेत्रीनं सायबर पोलिसात ऑनलाईन तक्रार दिली. याप्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 506 आणि माहिती व तंत्रज्ञान कायदा कलम 67 आणि 67अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Punjabi actress filed case
सोशल मीडियावरील फोटो मॉर्फ प्रकरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 10:37 AM IST

मुंबई : सोशल मीडियावरील फोटोंत बदलकरून अश्लील नग्न फोटो मित्राच्या फेसबुकवर पोस्ट केल्याबाबतची माहिती पंजाबी अभिनेत्रीस तिच्या मित्राने निदर्शनास आणून दिली. त्यानंतर कामात असल्यानं अभिनेत्रीने सायबर क्राईमच्या वेब पोर्टलवर तक्रार दाखल केली. 8 जानेवारीला वर्सोवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी पंजाबी अभिनेत्रीने गुन्हा दाखल करत मित्रावर संशय व्यक्त केला असल्याची माहिती पोलीस अधिकारी गणेश पवार यांनी दिली आहे.

नग्न छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल : पंजाबी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या ३७ वर्षीय अभिनेत्रीने वर्सोवा पोलिस स्टेशनमध्ये मॉर्फ केलेले नग्न छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एखाद्या मित्राचे हे कृत्य असू शकते, असे अभिनेत्रीनं पोलिसांना सांगितले. अभिनेत्रीचा न्यूड फोटो पंजाबमध्ये राहणाऱ्या तिच्या मित्र आणि पालकांपर्यंत पोहोचला. एका मित्रानं तिला फोन करून तिचे नग्न छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगितलं. त्यामुळे 27 डिसेंबरला सायंकाळी 5.30 वाजता तिला हा प्रकार कळला.

मित्रांकडून मागवले स्क्रीनशॉट्स : अभिनेत्रीने तिच्या मित्रांकडून स्क्रीनशॉट्स मागवले. पण कामाच्या कमिटमेंटमुळे ती लगेच केस नोंदवू शकली नाही. 7 जानेवारीला तिने ऑनलाइन तक्रार दाखल केली. पुण्यातील पिरंगुट येथे राहणाऱ्या एका पुरुष मित्रावर तिचा संशय असल्याचा दावा या अभिनेत्रीनं केला आहे. त्याचा मोबाईल नंबर तपासासाठी पोलिसांना दिला आहे. 31 डिसेंबरला अभिनेत्रीच्या आणखी एका मित्राला तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नग्न फोटो सापडले. जीवे मारण्याची देखील धमकी अभिनेत्रीला दिली असल्याची माहिती माहिती पोलिसांना दिली. या अभिनेत्रीनं वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 506 आणि कलम 67 आणि 67 (अ) अंतर्गत एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर; आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संत-महंत मोंदींना करणार 'ही' मोठी विनंती
  2. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील 44 फ्लायओव्हर्स आणि भुयारी मार्गांची डागडुजी करणं गरजेचं, व्हीजेटीआय संस्थेचा अहवाल
  3. पंतप्रधान मोदींचं 'महाराष्ट्र मिशन', आज राज्यात सुमारे 30 हजार कोटींच्या विकास प्रकल्पांचे करणार उद्घाटन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.