मुंबई : Mumbai Crime News : दक्षिण मुंबईत एका 14 वर्षीय दिव्यांग मुलीचं अपहरण करून धावत्या टॅक्सीत तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक (Minor Girl Rape in taxi) घटना समोर आलीय. याप्रकरणी मलबार हिल पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी टॅक्सी चालक आणि प्रवाशाला पोलिसांनी अटक (Mumbai Crime News) केलीय. प्रकाश पांडे असे टॅक्सी चालकाचे नाव असून सलमान असे प्रवाशाचे नाव असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलंय.
आजारी मुलीचे अपहरण : पीडित मुलीचे तिच्या कुटुंबियांशी भांडण झाल्यानंतर ती घरातून निघून मालवणी इथं नातेवाइकांकडे जात होती. मुलगी मालवणीला जाण्यासाठी टॅक्सीत बसली, त्यानंतर टॅक्सीचालकाने दादरमधील त्याच्या ओळखीच्या सलमान शेखला टॅक्सीत बसवले आणि दादर ते सांताक्रूझ दरम्यान सलमान शेखने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिला वाकोला भागात सोडले. ही तरुणी या परिसरात फिरत होती. पोलिसांनी तिची चौकशी केली असता काही गैरप्रकार आढळून आल्याचा त्यांना संशय आला. पोलीस तिला ठाण्यात घेऊन गेले आणि त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार आणि बाल लैंगिक संरक्षण (पॉक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून तपासाची वेगवान चक्रे फिरवून अवघ्या 2 तासांत दोन्ही आरोपींना अटक केलीय. या गुन्ह्यात मुख्य आरोपीला मदत केल्याप्रकरणी टॅक्सी चालक प्रकाश पांडेला अटक करण्यात आल्याचं पोलीसांनी सांगितले. याप्रकरणी पोलीसांनी वेगवेगळ्या अँगलने तपास सुरू केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
महिलांवरील अत्याचारात वाढ : राज्यासह मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांकडून कायदा आणि सुव्यवस्था धाब्यावर बसवली जात आहे. यामुळं महिलांची सुरक्षाही धोक्यात आल्याचं चित्र आहे. मुंबई पोलीसांचे गुन्हेगारांवर वचक नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळेच अशा प्रकारच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच मुंबईत सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच ही एक धक्कादायक घटना समोर आलीय.
हेही वाचा :