ETV Bharat / state

मुंबई पोलीस आयुक्त 'मराठी'चा वापरत करत नाही; म्हणून... - महाराष्ट्र एकीकरण समिती मुंबई

परमवीर सिंह हे ठाण्याचे आयुक्त असल्यापासून आम्ही मराठी वापरासंबंधी त्यांची तक्रार समिती करत आहे. मात्र, इतक्या वर्षात ते राज्य शासनाचे नियम पाळत नाहीत हे निदर्शनास येत आहे. मराठीचा नेहमी अवमान करत आले आहेत. त्यामुळे गृहमंत्री आणि मराठी भाषा विभागमंत्री यांनी याकडे लक्ष घालून मुंबईची, महाराष्ट्राची मराठी ओळख पुसू देऊ नये, यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती मराठी एकीकरण समितीने केली आहे.

पोलीस आयुक्त परमवीर सिंह
पोलीस आयुक्त परमवीर सिंह
author img

By

Published : Mar 10, 2020, 11:59 AM IST

Updated : Mar 10, 2020, 1:57 PM IST

मुंबई - शहराचे नवनिर्वाचित पोलीस आयुक्त परमवीर सिंह मराठी भाषेचा वापर करत नाहीत, याबद्दल मराठी एकीकरण समिती संघटनेचे उपाध्यक्ष आंनदा पाटील आणि सहकारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच त्याच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.

गोवर्धन देशमुख (अध्यक्ष, महाराष्ट्र एकीकरण समिती)

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून परमवीर सिंह यांची २९ फेब्रुवारी २०२० रोजी नियुक्ती झाली. यांनतर त्यांनी अधिभार स्विकारल्यावर पोलीस मुख्यालयात पहिल्यांदा पत्रकार परिषदे घेतली असता, मराठीत संवाद न साधता, हिंदी भाषेत साधला होता. त्यावेळी ते मराठीत का बोलले नाहीत, असा सवाल करणारे व्हिडिओ माध्यमांवर सर्वत्र पसरले होते. पोलीस विभागाला मराठी वापरण्याचे आदेश आणि तसेच नियम असताना ते पाळण्यात येत नाहीत. परमवीर सिंह हे ठाण्याचे आयुक्त असल्यापासून आम्ही मराठी वापरासंबंधी त्यांची तक्रार समिती करत आहे. मात्र, इतक्या वर्षात ते राज्यशासनाचे नियम पाळत नाहीत हे निदर्शनास येत आहे. मराठीचा नेहमी अवमान करत आले आहेत. त्यामुळे गृहमंत्री आणि मराठी भाषा विभागमंत्री यांनी याकडे लक्ष घालून मुंबईची, महाराष्ट्राची मराठी ओळख पुसू देऊ नये, यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती मराठी एकीकरण समितीने केली आहे.

mh ekikaran samiti letter to hm
महाराष्ट्र एकीकरण समितीने केलेली लेखी तक्रार

हेही वाचा - सूर्य तिकडे उगवेल म्हणून ते गेले, पण झाले उलटच.. अजित पवारांचा टोला

राज्यात शासन निर्णयानुसार मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक आणि अनिवार्य आहे. मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्याकडून राजभाषा अधिनियम १९६४ आणि अधिनियम सुधारित आवृत्ती २०१५ च्या शासन निर्णयाचे उल्लंघन झाले आहे. त्या अनुषंगाने तातडीने गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही त्यांच्यावर करण्यात यावी, ही विनंती आम्ही केली, असे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन सखाराम देशमुख यांनी सांगितले.

Last Updated : Mar 10, 2020, 1:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.