ETV Bharat / state

टीआरपी वाढवण्यासाठी पैसे दिले जात असल्याची ग्राहकांची कबुली - मुंबई टीआरपी न्यूज

पोलिसांकडून टीव्ही चॅनल्सच्या टीआरपी घोटाळ्याचा एक मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. आपल्या चॅनेलचा टीआरपी जास्त यावा, यासाठी काही चॅनल्स संबंधितांना पैसे देऊन दिवसभर टीव्ही सुरू ठेवून आपले चॅनल लावण्यास सांगत आहेत.

TRP
टीआरपी
author img

By

Published : Oct 9, 2020, 1:38 PM IST

Updated : Oct 9, 2020, 8:52 PM IST

मुंबई - टीव्ही वाहिन्यांच्या टेलीव्हिजन रेटिंग पॉईंट (टीआरपी) संदर्भातील घोटाळा मुंबई पोलिसांनी समोर आणला आहेत. यात देशातील मोठ्या न्यूज चॅनलची नावे सुद्धा उघड झाली आहेत. आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासात निदर्शनास आले की, ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ही कंपनी भारतात टीव्ही चॅनल्स, टीव्ही प्रोग्रॅमचे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट काढणारी एकमेव कंपनी आहे. सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ही कंपनी सध्या काम करत असून टीआरपी मोजण्यासाठी या कंपनीकडून भारतातील ठराविक घरांमध्ये बॅरोमीटर नावाचे यंत्र लावण्यात आले आहे. मुंबईत 2 हजार बॅरोमीटर लावण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. मात्र, या कंपनीच्यावतीने हंसा रिसर्च ग्रुप या एजन्सीला हे कंत्राट देण्यात आले आहे.

टीआरपी वाढवण्यासाठी पैसे दिले जात असल्याची ग्राहकांची कबुली

हंसा रिसर्च ग्रुपमध्ये रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या विशाल भंडारी या आरोपीची मुंबई पोलिसांनी चौकशी केली आहे. त्याने मुंबईतील कांदिवली परिसरामध्ये पाच व्यक्तींच्या घरांमध्ये बॅरोमीटर लावल्याचे सांगितल. हे बॅरोमीटर लावत असताना त्याने एका विशिष्ट वाहिनीला दिवसभरात दोन तास चालू ठेवण्यास सांगितले. यासाठी विशाल भंडारी हा संबंधित लोकांना दर महिन्याला 400 रुपये देत होता.

barometer for trp
बॅरोमीटर. टीआरपी मोजण्यासाठी याचा वापर केला जातो.

विशाल भंडारी याने अशाच एका व्यक्तीला त्याच्या घरामध्ये बॅरोमीटर लावून एक सिनेमा चॅनेल दिवसभरात दोन तास चालू ठेवण्याची अट घालून महिन्याला 400 रुपये देण्याचे कबूल केले होते. गेले पाच-सहा महिने भंडारी या संबंधित व्यक्तीला दरमहा 400 रुपये देत होता. या व्यक्तीशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी फोनवर संपर्क साधून विचारणा केली असता संबंधित व्यक्तीनेही विशाल भंडारी पैसे देत असल्याचे कबूल केले आहे.

हंसा रिसर्च ग्रुपची या संदर्भात या अगोदरही चौकशी करण्यात येत होती. त्यावेळी विशाल भंडारी याला हंसा ग्रुपच्या ऑडिट टीमबद्दल विचारले असता त्याने ही गोष्ट कबूल केली होती. त्यानंतर त्याला कामावरून काढून टाकण्यात आल्याचे ग्रुपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Last Updated : Oct 9, 2020, 8:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.