मुंबई : आपल्या मोबाईलवर विदेशातून आलेले कॉल (International Call) भारतीय स्थानिक नंबर डिस्प्ले करत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्याची धक्कादायक माहिती डिओटीने नवी मुंबई पोलिसांना (Fake call info DTO to Mumbai Police) नुकतीच दिली. यानंतर पोलिसांनी तुर्भे येथील एम.एस. ग्लोबल एंटरप्राईस या बोगस कॉल सेंटरवर कारवाई केली (Bogus call center action) आहे. नवी मुंबई सायबर सेल व गुन्हे शाखा कक्ष-१ पोलीसांकडून International illegal VoIP Call Routing करणारे बोगस कॉल सेंटर उध्वस्त करण्यात आले आहे. (Latest news from Mumbai) (Mumbai Crime)
बोगस कॉल सेंटरमुळे देशाला अडीच कोटीचा चूना- या प्रकरणी सुरज मुरली वर्मा (वय 30 वर्षे), अनुप मुरली वर्मा ( वय 40 वर्षे ), साजिद जलील सय्यद ( वय 36 वर्षे ) आणि अब्दुल अजिज फिरोजाबादी (वय 42 वर्षे) या आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे आरोपी मिरारोड, ठाणे, कांदिवली, बोरीवली परिसरातील असून त्यांना एकाच वेळेस छापा टाकून पकडण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपींना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सर्व्हर, मोबाईल फोन्स असा एकूण 7 लाख 26 हजार रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, या बोगस कॉल सेंटरमुळे भारताला 2 कोटी 62 लाख 79 हजार रुपयांचा चुना लागला आहे.
कधी मंदिर उडविण्याची तर कधी योगींना मारण्याची धमकी- आरोपींनी अशाच प्रकारे हैद्राबाद येथील डाटा सेंटरमध्ये देखील बोगस कॉल सेंटर थाटले असून हैद्राबाद पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखनाथ पोलीस ठाण्यात देखील अशाच प्रकारच्या बोगस कॉल सेंटर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यूपीतील गोरखनाथ मंदीर उडवू आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हत्या करू अशी धमकी देणारे कॉल याच बोगस कॉल सेंटरच्या सर्व्हरमधून गेला असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त बिपीन कुमार सिंह, सहआयुक्त जय जाधव, अपर पोलीस आयुक्त गुन्हे महेश घुर्ये, पोलीस उपायुक्त गुन्हे सुरेश मेंगडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
असा झाला बोगस कॉलसेंटरचा पर्दाफाश - केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, कर्नाटका, दिल्ली, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यातील नागरीकांचे परदेशात बहरिन, युएसए, बांग्लादेश, अरब देश या देशात राहणारे नातेवाईक आणि मित्रपरिवार राहतात. या नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून येणारे आंतरराष्ट्रीय फोन कॉल्स् हे त्यांचे परदेशातील मोबाईल क्रमांकाने मोबाईलवर डिस्प्ले न होता त्याऐवजी भारतीय स्थानिक क्रमांक मोबाईलवर दिसून येत होते. अशा अनेक तक्रारी डिओटीच्या हेल्पलाईन क्रमांकावर प्राप्त झाल्यानंतर या तक्रारींबाबत DOT कडून नवी मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर या बोगस कॉलसेंटरचा पर्दाफाश झाला.
कसे सुरू झाले बोगस कॉल सेंटर?
आरोपींनी स्थानिक कॉल सेंटर चालवणार असल्याचे सांगत मालकाला जादा भाडे देऊन भाडेकरारनामा तयार केला. या भाडेकरारनाम्याच्या आधारे गुमास्ता परवाना, उद्यम आधार, व्यवसाय परवाना, GST परवाना, कंपनीचे पॅन कार्ड ही कागदपत्रे तयार करून एक 'एम. एस. एंटरप्राईस' नावाची बोगस कंपनी तयार केली. बोगस कंपनीच्या तयार केलेल्या कागदपत्रांच्या आधारे व अन्य व्यक्तिच्या नावाने अनेक सिमकार्ड व अनेक मोबाईल फोन्स् प्राप्त केले. बोगस मोबाईल सिमकार्डचा वापर कंपनी रजिस्ट्रेशन, कंपनी संपर्क क्रमांक म्हणून केला. त्यानंतर बोगस कंपनीचे कागदपत्र व अन्य व्यक्तींच्या नावाने प्राप्त केलेले मोबाईल क्रमांक या माहितीच्या आधारे Local Mobile Service Provider यांचेकडून SIP Trunk Line / PRI Lines ( upto 1500 ) व Internet leased line Connectivity प्राप्त केली.
बोगस कॉलसेंटरसाठी या तंत्रज्ञानाचा वापर- त्यानंतर स्थानिक डाटा सेंटर येथील सर्व्हरची सेवा प्राप्त करून त्यामध्ये मोबाईल सर्व्हिस प्रोव्हाडर यांचेकडुन प्राप्त केलेल्या SIP Trunk Lines / PRI Lines ( upto 1500 ) व Internet leased line हे बोगस कंपनीच्या नावाने स्थापित केलेल्या सर्व्हरमध्ये जोडून त्यामध्ये Astrick Software o Linux Operating System चा वापर करून बोगस कॉल सेंटर सुरू केले. डाटा सेंटर येथे कार्यान्वित केलेले Bogus Call Center Server pss IP Address ( Intenet Protocol ) हे परदेशातील IP Address हे सोबत Configure करून या जोडणीव्दारे International VolP Call Traffic ही भारत सरकारच्या Department of Tele Communication ps International Legal Gateways By चें करण्यात आले. हे Bogus International VolP Call Routing व्दारे बेकायदेशिररित्या भारतात कॉल्स पाठवून भारत सरकारची फसवणूक करतात. ही फसवणूक केवळ भारतापुरती मर्यादित नसून ज्या देशातून हे कॉल येत होते त्या देशांनाही चांगलाच चुना लागला आहे. आर्थिक फसवणुकीपेक्षा देशविघातक कारवाईला खतपाणी घालण्याच्या दृष्टीने अशी बोगस कॉलसेंटर धोकादायक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नवी मुंबईत अशी आणखी काही बोगस कॉल सेंटर्स कार्यरत असल्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्या दिशेने नवी मुंबई पोलीस तपास करत आहेत.