मुंबई : बहुप्रतिष्ठित मुंबई आमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या संदर्भातील निविदा येत्या 40 दिवसात जाहीर होणार आहे. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुल या ठिकाणी बुलेट ट्रेनचे रेल्वे स्थानक केले जाणार आहे. बुलेट ट्रेन मार्गासाठी ठाणे डेपोच्या निविदा 15 मार्च 2023 रोजी खुल्या होणार आहेत. बुलेट ट्रेन प्रकल्पाला 12 फेब्रुवारी म्हणजे आज बरोबर सात वर्षे पूर्ण होत आहे.
बुलेट ट्रेनची कश्यासाठी वाचा : रेल्वे, खासगी वाहनांनी मुंबई, गुजरातदरम्यान दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. प्रवास करणाऱ्यांमध्ये मोठा व्यापारी वर्ग असतो. मुंबई ते अहमदाबाद विमान सेवा, १४० हून अधिक जाणाऱ्या-येणाऱ्या रेल्वेगाड्या, सहा पदरी रस्ते या दोन शहरादरम्यान आहेत. या मार्गावर रेल्वेने सहा ते सात तासांत प्रवास होतो. रस्ते मार्गेही साधारण तेवढाच वेळ लागतो. आता अवघ्या अडीच तासांत अंतर पार करणाऱ्या बुलेट ट्रेनचे स्वप्न केंद्र सरकारने बाळगले आहे. त्यासाठी शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यावर प्रकल्पाच्या मंजुरी जलद गतीने दिल्या गेल्या. यूपीए सरकारने २००७-०८ च्या रेल्वे अर्थसंकल्पात बुलेट ट्रेन या अतिवेगवान वाहतूक सेवेची कल्पना मांडली होती. मात्र, हा महागडा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या परवडणारा नाही, अशा निष्कर्षामुळे हा प्रकल्प मागे पडला. त्यानंतर केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी प्रकल्प पुढे नेण्याचा निर्णय घेतला. २०१५ साली बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जपान दौऱ्यादरम्यान स्वाक्षरी केली.
प्रकल्पाची सद्यस्थिती : केंद्रशासित दादरा नगर हवेली आणि गुजरात येथे बऱ्यापैकी भूसंपादन झालेला आहे. मात्र, महाराष्ट्रामध्ये थोडीफार भूसंपादन बाकी आहे. महाराष्ट्रामध्ये भूसंपादनाची एकूण स्थिती आहे 98.79 टक्के तर दादरा नगर हवेली या केंद्रशासित राज्यात 100 टक्केभूसंपादन झालेले आहे. तर, गुजरात या राज्यात भूसंपादनाची स्थिती 98.91 टक्के आहे. दोन्ही राज्यातील भूसंपादनाची स्थिती सध्या 98.88 टक्के इतकी आहे.
बुलेट ट्रेनचे वैशिष्टये -
- मुंबई ते अहमदाबाद अशी भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचा मार्ग.
- कॉरिडॉरची लांबी ५०६ किलो मीटरप्रकल्प पुर्णत्वाला जाण्यासाठी तब्बल १ लाख १०,००० कोटी रूपयांची आवश्यकता.
- अरबी समुद्रात एकूण सात किलोमीटरचा अंडरवॉटर बोगदा तयार करण्यात येणा
- देशात पहिल्यांदाच सुरू होत असलेली बुलेट ट्रेन समुद्राखालून धावणार'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड' आणि टनेल बोरिंग मशीनचा वापर करून पाण्याखालील बोगद्याचे काम होणार
- ट्रेनमध्ये अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणासंपूर्ण ट्रेन वातानुकूलित, स्वयंचलित दरवाजे
बुलेट ट्रेन एकेरी प्रवासाचे तिकीट दर -
बीकेसी-विरार ५०० रूपये. प्रवासासाठी लागणारा कालावधी -२४
मिनिटेबीकेसी-भोईसर ७५० रूपये. प्रवासासाठी लागणारा कालावधी - ३९
मिनिटेबीकेसी-ठाणे २५० रूपये. प्रवासासाठी लागणारा कालावधी - १० मिनिटे
भूसंपादन हा महत्त्वाचा भाग : बुलेट ट्रेन चा प्रकल्प रखडण्यामागे भूसंपादन हा महत्त्वाचा भाग आहे. गुजरात आणि दादरा नगर हवेली मध्ये भूसंपादन झाले मात्र महाराष्ट्रात शंभर टक्के भूसंपादन होणे बाकी आहे. त्यामुळे देखील हा प्रकल्प रखडला आहे. या बुलेट ट्रेन च्या भुयारी मार्गामध्ये किंवा रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी अनेक ठिकाणी पूल, बोगदे देखभाल कामे होणार आहे. त्यासाठी डेपो याचा समावेश असलेली नागरी कामांसाठीची इमारती असणार. यामध्ये एकूण तीन इमारती उभ्या केल्या जाणार आहे. तसेच जे रेल्वे स्थानकाचे ठिकाण आहे त्यामध्ये वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, यासोबत ठाणे, त्यानंतर विरार, तसेच बोईसर, गुजरात महाराष्ट्राच्या सीमेलगत शिळफाटा, जरोली गावाच्या दरम्यान ठाणे जिल्ह्यात डेप साठी जोडणीची कामे केली जाणार आहे. हे अंतर जवळजवळ 135 किलोमीटर आहे. जे पॅकेज सी तीनमध्ये होणार आहे .
बुलेट ट्रेन ठाणे डेपोच्या निविदा 15 मार्च 2023 रोजी : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी बुलेट ट्रेनचं रेल्वे स्थानक जे होणार आहे. तिथून ते ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा पर्यंतच पॅकेज सी टू असे त्याला म्हटले जाते. या ठिकाणी ठाणे जिल्ह्यात ठाणे बुलेट ट्रेन डेपोचे जे रेल्वे स्थानक होणार आहे. त्या ठिकाणी डिझाईन आणि बांधकाम तसेच सिविल वर्क बिल्डिंग वर्क इन्फेक्शन इन्स्पेक्शन वर्क या संदर्भातील निविदा 15 मार्च 2023 रोजी खुली केली जाणार आहे. चाचणी ,देखभाल सुविधा इतर कामे अशा सर्व बाबींची निविदा 26 एप्रिल 2023 रोजी उघडण्याचे निश्चित केलेले आहे.
तीन तासात मुंबई - अहमदाबाद प्रवास - एकूण बुलेट ट्रेनसाठीचे अंतर 508 किलोमीटर आहे. त्यापैकी गुजरातमध्ये 348 किलोमीटर तर दादरा, नगर हवेलीमध्ये अवघे चार किलोमीटर आणि 156 किलोमीटर मार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे. या बुलेट ट्रेनचा ताशी गती 320 किलोमीटर आहे. मुंबई-अहमदाबाद हे ३ तासांत अंतर पूर्ण करू शकते.बुलेट ट्रेनची रेल्वे स्थानके : बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई यामध्ये एकूण 12 स्थानकं आहेत. त्यापैकी गुजरातमध्ये आठ स्थानके आहेत. तसेच महाराष्ट्रामध्ये चार स्थानके आहेत. गुजरातमध्ये वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद/नदियाड, अहमदाबाद व शेवटचे स्थानक साबरमती तर महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, विरार आणि बोईसर.
तीन तासात मुंबई : अहमदाबाद प्रवास - एकूण बुलेट ट्रेनसाठीचे अंतर 508 किलोमीटर आहे. त्यापैकी गुजरातमध्ये 348 किलोमीटर तर दादरा, नगर हवेलीमध्ये अवघे चार किलोमीटर आणि 156 किलोमीटर मार्ग महाराष्ट्रातून जाणार आहे. या बुलेट ट्रेनचा ताशी गती 320 किलोमीटर आहे. मुंबई-अहमदाबाद हे ३ तासांत अंतर पूर्ण करू शकते.बुलेट ट्रेनची रेल्वे स्थानके : बुलेट ट्रेन अहमदाबाद ते मुंबई यामध्ये एकूण 12 स्थानकं आहेत. त्यापैकी गुजरातमध्ये आठ स्थानके आहेत. तसेच महाराष्ट्रामध्ये चार स्थानके आहेत. गुजरातमध्ये वापी, बिल्लीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद/नदियाड, अहमदाबाद व शेवटचे स्थानक साबरमती तर महाराष्ट्रात मुंबई , ठाणे , विरार आणि बोईसर.
गुजरातमध्ये तीन तर महाराष्ट्रामध्ये एक डेपो असणार : गुजरातमध्ये एकूण तीन डेपो बुलेट ट्रेनचे उभारली जाणार आहेत. महाराष्ट्रामध्ये ठाण्यात एख डपो उभारला जाणार आहे. साबरमती या ठिकाणी ऑपरेशनल कंट्रोल सेंटर उभारले जाणार आहे. संपूर्ण या बुलेट ट्रेनच्या मार्गाबाबतचे ऑपरेशन साबरमती या डेपोमधून केले जाणार आहे.
राष्ट्रीय गतिशक्ती महामंडळाकडून या कामासाठी दिले कंत्राट : यासंदर्भात राष्ट्रीय प्रवक्त्या सुषमा गौर यांनी ईटीवी भारत सोबत संवाद साधताना सांगितले, गुजरात, दादरा नगर हवेली संपूर्ण कामासाठी सिव्हिल कार्य पूल आणि ट्रॅक साठी 100 टक्के काम झालेल आहे. तसेच पूल बांधणे स्टेशन ट्रॅक इत्यादी बांधकामासाठी 352 किलोमीटरचे कंत्राट राष्ट्रीय गतिशक्ती रेल्वे महामंडळाकडून देण्यात आलेले आहे. सात वर्ष आज रोजी बुलेट ट्रेनच्या प्रकल्प सुरू होण्याला पूर्ण होत आहेत.'