ETV Bharat / state

एमपीएससी परीक्षांच्या तारखा जाहीर, विद्यार्थी संघटनांकडून केंद्र बदलण्याची मागणी

राज्यसेवा पूर्व परीक्षा ही 13 सप्टेंबर, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ही परीक्षा 11 ऑक्टोबर तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेऊन आयोगाकडून वेळोवेळी फेर आढावा घेण्यात येईल. याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

MPSC schedule announced
एमपीएससी परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर
author img

By

Published : Jun 17, 2020, 7:12 PM IST

मुंबई - राज्यात मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. आता अखेर या परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) जाहीर केले आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे एप्रिल-मे महिन्यात आयोजित केलेल्या परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. त्यातील तीन परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून या परीक्षा सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पार पडणार आहेत.

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन या तारखात बदल करण्याची वेळ आल्यास तशी सूचना विद्यार्थ्यांना दिली जाईल, असेही आयोगाने म्हटले आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा ही 13 सप्टेंबर, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ही परीक्षा 11 ऑक्टोबर तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. लॉकडाऊनचा कालावधी लक्षात घेऊन आयोगाकडून वेळोवेळी फेर आढावा घेण्यात येईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

राज्यातील सर्व परिस्थिती लक्षात घेऊन शहरांमधून गावी गेलेल्या विद्यार्थ्यांना आयोगाने आपल्या सोयीनुसार परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा द्यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी शहरांमध्ये येतात. पुणे शहरात 40 हजार विद्यार्थी अभ्यास करत आहेत. कोरोनामुळे हे विद्यार्थी आपापल्या गावी गेले आहेत. कोरोनाची सध्याची स्थिती पाहता या विद्यार्थ्यांना शहरामध्ये परीक्षेसाठी येणे अवघड असल्याचे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे किरण निंभोरे यांनी म्हटले आहे. तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनीही यासाठी आपण आयोगाकडे पत्रव्यवहार करून विद्यार्थ्यांना जवळचे परीक्षा केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.