ETV Bharat / state

दिल्लीतील घटनेचे मी समर्थन नाही करणार नाही -  शरद पवार - मुंबई शहर बातमी

मंगळवारी (दि. 26 जाने.) शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान दिल्लीत झालेल्या घटनेचा निषेध करत खासदार शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jan 27, 2021, 8:23 PM IST

Updated : Jan 27, 2021, 8:44 PM IST

मुंबई - मंगळवारी (दि. 26 जाने.) दिल्लीत जे घडले ते अशोभानीय असून त्या घटनेचे मी समर्थनही करणार नाही. परंतु जे शेतकरी 60 दिवस दिल्लीच्या वेशीवर येऊन शांततेत आंदोलन करत होते. ते आंदोलन दिल्लीतील राज्यकर्त्यांनी संवेदनशीलपणे लक्षात घेतले असते तर ही वेळ आली नसती आणि काही लोकांनी या मंगळवारच्या आंदोलनात फायदा घेतला नसता, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

बोलताना शरद पवार

माजी केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव शुगर फॅक्टरीचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रमुख पाहुणे म्हणून गोकुळ पटनाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

...म्हणून अण्णासाहेबांना यशवंतराव चव्हणांनी दिली होती लोकसभेची उमेदवारी

अण्णासाहेब शिंदे यांच्या योगदानावर पवार म्हणाले की, त्यांचे कर्तुत्व पाहूनच 1962 साली यशवंतराव चव्हाण यांनी लोकसभेची उमेदवारी दिली होती. थोड्या कालावधीत त्यांनी शेतीसाठी आस्था असलेल्या अनेक सहकाऱ्यांची शक्ती उभी केली होती. आपल्या कर्तृत्वाचा आणि दृष्टीचा एक ठसा उमटवला होता. शेती संशोधनाच्या क्षेत्रावर त्यांनी भर दिला आणि अनेक शेती संदर्भातील संस्थेने उदयाला आल्या. पुसासारख्या संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता अशी माहितीही पवार यांनी यावेळी दिली.

संशोधन केवळ ग्रंथालयापुरते मर्यादित नको

पवार म्हणाले की, शेतीच्या क्षेत्रात संशोधनासाठी असलेली तरतूद ही चौपट करण्याची गरज आहे आणि संशोधन वाढवले पाहिजे आज देशभरात पाच हजाराहून अधिक संशोधन काम करत आहेत. त्यामुळे शेतीतील उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि अधिक गुंतवणूक झाली पाहिजे, असे मतही पवार यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच हे संशोधन केवळ ग्रंथालया पुरते मर्यादित न राहता शेतीच्या बांधावर जाऊन झाले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांनी साखर एके साखर करू नये

राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन सुरू असून मागणी कमी झाली आहे. त्यामुळे केवळ शेतकऱ्यांनी साखर एके साखर करून चालणार नाही. तर साखर उत्पादन थांबून त्याच एका पिकापासून इथेनॉल तयार करता येईल का याकडे वळले पाहिजे. विशेष म्हणजे उसाच्या रसापासून इथेनॉल करता येईल आणि पुढे त्याच्या सीएनजी गॅस अथवा इतर काही उत्पादने एकाच वेळी तयार करून सर्वसामान्य लोकांच्या गरजा भागवल्या पाहिजेत आणि यासाठी शेतकऱ्यांनी पुढे पाहिजे, असे आवाहन पवार यांनी केले.

Last Updated : Jan 27, 2021, 8:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.