मुंबई - भाजप खासदार मनोज कोटक यांनी आज दुपारी गोवंडी येथील शिवजीनगरमधील लसीकरण केंद्राला भेट दिली. यावेळी कोविड केंद्रामध्ये डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व रुग्णांशी मनोज कोटक यांनी संवाद साधत सर्वांचे मनोबल वाढवले.
हेही वाचा - राज्यात 62 हजार 97 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 519 रुग्णांचा मृत्यू
पंतप्रधानांनी १८ वर्ष वयोगटावरील सर्व व्यक्तींचे १ मे पासून मोफत कोविड लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवजीनगरमधील कोविड लसीकरण केंद्र कसे काम करते, याची पाहणी करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. जेव्हा एक तारखेला लसीकरण सुरू होईल तेव्हा काय काय तयारी करावी लागेल, या संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत, असे कोटक यांनी सांगितले.
कोविड लसीची कमतरता असल्यामुळे शताब्दी रुग्णालयात काही लोकांना पाठवले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत माझी आज चर्चा झाली आहे. सर्व रुग्णालयांत व्यवस्थित डोस पुरवले जातील, असा विश्वास त्यांनी मला विश्वास दिला, असे खासदार मनोज कोटक यांनी सांगितले.
हेही वाचा - राज्यातील रिक्षा परवानाधारकांसाठी 107 कोटी सानुग्रह अनुदान जाहीर