मुंबई - देशात मार्चमहिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू आहे. सध्या याची तीव्रता कमी होत आहे. 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुंबईत शनिवारी 6 हजार 482 कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 1 लाख 14 हजार 207 जणांना लस दिली आहे. त्यामध्ये 90 हजार 34 आरोग्य आणि 24 हजार 173 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
लसीकरणाची आकडेवारी -
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोविन अॅपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे काही काळ लसीकरण स्थगित करण्यात आले होते. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत शनिवारी 22 लसीकरण केंद्रांच्या 100 बूथवर 4 हजार 400 आरोग्य कर्मचारी तर 5 हजार 600 फ्रंटलाईन वर्कर, असे एकूण 10 हजार जणांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 2 हजार 618 आरोग्य कर्मचारी तर 3 हजार 864 फ्रंटलाईन वर्कर अशा एकूण 6 हजार 482 जणांना लस देण्यात आली. यातील 5 जणांवर सौम्य दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. मुंबईत आतापर्यंत 1 लाख 14 हजार 207 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.
कोणत्या रुग्णालयात किती लसीकरण -
16 जानेवारीपासून आतापार्यंत कस्तुरबा हॉस्पिटल 779, नायर हॉस्पिटल 14 हजार 896, जेजे हॉस्पिटल 861, केईएम 13 हजार 938, सायन हॉस्पिटल 6 हजार 514, व्ही एन देसाई 1 हजार 733, बिकेसी जंबो 11 हजार 119, बांद्रा भाभा 5 हजार 241, सेव्हन हिल हॉस्पिटल 7 हजार 442, कूपर हॉस्पिटल 9 हजार 192, गोरेगाव नेस्को 4 हजार 309, एस के पाटील 1 हजार 337, एम डब्लू देसाई हॉस्पिटल 841, डॉ. आंबेडकर हॉस्पिटल 12 हजार 976, दहिसर जंबो 1 हजार 239, भगवती हॉस्पिटल 970, कुर्ला भाभा 323, सॅनिटरी गोवंडी 1 हजार 515, बीएआरसी 917, माँ हॉस्पिटल 1 हजार 92, राजावाडी हॉस्पिटल 13 हजार 918, वीर सावरकर 1 हजार 305, मुलुंड जंबो 1 हजार 750, अशा एकूण 1 लाख 14 हजार 207 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.