मुंबई - देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. कोविन ऍपमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्थगित करण्यात आली होती. 19 जानेवारीपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आज (दि. 25 जाने.) 10 लसीकरण केंद्रांवर 65 बूथवर 5 हजार 5 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली असून 10 जणांवर सौम्य दुष्परिणाम जाणवून आले. आतापर्यंत 18 हजार 202 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे.
आज झालेले लसीकरण
मुंबईत आज (दि. 25 जाने.) 6 हजार 500 लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. महापालिकेच्या 9 तर राज्य सरकारच्या 1 अशा एकूण 10 लसीकरण केंद्रांमधील 65 बूथवर 5 हजार 5 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
मुंबईत आज (सोमवार) एकूण उद्दिष्टापेक्षा 77 टक्के लसीकरण करण्यात आरोग्य विभागाला यश आले. त्यात परळ येथील केईएम रुग्णालयात 787, सायन येथील टिळक रुग्णालय 459, विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटल 562, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय 578, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय 55, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय 860, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय 679, बिकेसी येथील जंबो हॉस्पिटल 508, बांद्रा भाभा हॉस्पिटल 447, भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे हॉस्पिटल 34 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
आतापर्यंत 18 हजार 202 लसीकरण
16 जानेवारीपासून आतापार्यंत 18 हजार 202 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यात परळ येथील केईएम रुग्णालयात 3 हजार 117, सायन येथील टिळक रुग्णालय 1 हजार 517, विलेपार्ले येथील कूपर हॉस्पिटल 2 हजार 135, मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालय 2 हजार 1, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालय 408, कांदिवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय 2 हजार 985, घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय 2 हजार 672, बिकेसी येथील जंबो हॉस्पिटल 1 हजार 788, बांद्रा भाभा हॉस्पिटल 1 हजार 444, भायखळा येथील राज्य सरकारच्या जेजे हॉस्पिटल 145 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली.
हेही वाचा - मुंबईत आज कोरोनाचे 348 नवे रुग्ण, 7 रुग्णांचा मृत्यू