ETV Bharat / state

मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी कुर्ल्यात गरिमा मॉडेल चौकी

महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना कामातील नैराश्य व कामाची आवड निर्माण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका व टाटा ट्रस्टने कुर्ला एल विभागात कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी एक नवीन चौकी सकिनाका जवळ उभी केली आहे. या चौकीमध्ये कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

author img

By

Published : Feb 25, 2020, 2:34 PM IST

मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी कुर्ल्यात गरिमा मॉडेल चौकी
मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी कुर्ल्यात गरिमा मॉडेल चौकी

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या परिसरामध्ये रोज ओला व सुका कचरा रहिवाशी टाकतात. कचरा पालिकेचे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये उचलून डम्पिंगपर्यंत पोहोचवतात. मात्र, कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्य, कामावरील साधने आणि स्वच्छतेकडे प्रशासनाकडून कायमच दुर्लक्ष होत असते, त्यामुळे हे कर्मचारी विविध व्याधींनी ग्रासलेले असतात. या कर्मचाऱ्यांना कामातील नैराश्य घालवण्यासाठी व कामाची आवड निर्माण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका व टाटा ट्रस्टने कुर्ला एल विभागात कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी एक नवीन चौकी साकिनाका जवळ उभी केली असून यात विविध सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

पालिका हद्दीतील चौकीमध्ये स्वच्छता कर्मचारी सकाळी ६ वाजता कामावर जाण्यासाठी घरून येतात. मात्र, कामाच्या ठिकाणी त्यांच्या आरोग्य व इतर सोयींकडे कायमच दुर्लक्ष असते. स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने असल्याने कपड्याची आदलाबदल असेल किंवा कामावरील साहित्याची सुरक्षा हे अपूर्णच असते. अशातच एक स्वच्छता कर्मचारी एकावेळी ६ ते ७ तास पदपथावरील धूळ, घाण कचरा एकत्र करीत जवळच्या कचरापेटीत टाकतो. कामाची वेळ संपल्यानंतर कर्मचारी चौकीमध्ये जाऊन विश्रांती घेण्यासाठी जातो. मात्र, विश्रांतीच्या ठिकाणीही अस्वच्छता असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते.

हेही वाचा - लोकनियुक्त सरपंच पद्धत होणार रद्द, विधानसभेत विधेयक मंजूर

कुर्ला एल वार्डमध्ये सुरू करण्यात आलेल्या नवीन चौकीमध्ये पुरुष व स्त्रियांची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. याबरोबर येथे आंघोळीसाठी पाण्याची व्यवस्था, जेवण ताजी व गरम ठेवण्यासाठी इलेक्ट्रिक साहित्य तसेच त्यांना कामात नैराश्य येऊ नये याकरिता कॅरम बोर्ड, लुडो असे मनोरंजनात्मक खेळ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचबरोबर शरीर निरोगी राहण्यासाठी खुली जिमही आहे. नुकतेच या कर्मचार्‍यांचे टाटा ट्रस्ट व पालिकेकडून हेल्थ चेकअप घेण्यात आले. या गरिमा चौकीमुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून सध्या समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तर, अशा गरिमा चौकी मुंबई शहर व उपनगरात सर्वत्र झाल्या पाहिजेत अशी भावना येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - ...म्हणून भाजपचा आझाद मैदानात एल्गार, फडणवीसांसह चंद्रकांत पाटील मोर्चाला करणार संबोधित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.