मुंबई- आर्थिक संकटाच्या कचाट्यात सापडल्यामुळे परळ येथील नरसोजी वाडिया मँटर्निटी रुग्णालय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. तशा प्रकारची नोटीसच रुग्णालय प्रशासनाने काढली आहे. त्यामुळे भविष्यात रुग्णालय बंद पडू नये यासाठी मनसे जनआंदोलन उभारणार आहे.
महाराष्ट्र शासन व मुंबई महानगरपालिका यांच्याकडून रुग्णालय प्रशासनाला पुरेसे अनुदान मिळाले नाही. त्यामुळे, रुग्णालय प्रशासन वैद्यकीय उपकरणे, पुरवठा आणि औषधे पुरवणाऱ्या विविध विक्रेत्यांची थकबाकी देऊ शकले नाही. त्यामुळे, रुग्णालय बंद पडण्याच्या मार्गावर आहे. वाडिया रुग्णालय बंद होत आहे हे ऐकून खेद वाटत आहे. माझे बाबा माझे वडील इथे जन्माला आले. वाडिया मॅटर्निटी रुग्णालय हे इथल्या गिरणी कामगारांसाठी स्वस्त दरात चांगले उपचार देणारे रुग्णालय होते. कालांतराने गिरण्या बंद झाल्या पण रुग्णालय आपली सेवा अद्यापही देत होते. पण, पालिका प्रशासन आणि राज्य सरकारने जे अनुदान द्यायला पाहिजे होत ते दिले नाही. त्यामुळे, रुग्णालयावर ही पाळी आली. मात्र, आम्ही रुग्णालय बंद होऊ देणार नाही. आम्ही लोकआंदोलन करून रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न करणार असल्याचे मनसेचे विभाग अध्यक्ष आनंद प्रभू यांनी सांगितले.
हेही वाचा- सरकारच्या परवानगीनेच गुंडांचा विद्यार्थ्यांवर हल्ला, कपिल पाटलांचा घणाघात