ETV Bharat / state

मनसे वर्धापनदिनी करणार 'राज'कीय सर्जिकल स्ट्राईक - मनसे

राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्यावरून भाजप सरकारला लक्ष्य केले होते. पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवान राजकीय बळी असू शकतात, असा हल्लाबोल राज यांनी केला होता. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता येत्या शनिवारी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांची मुंबईत सभा होणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे
author img

By

Published : Mar 6, 2019, 5:07 PM IST

मुंबई - सर्जिकल स्ट्राइकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या शनिवारी पक्षाच्या १३ व्या वर्धापन दिनी राजकीय सर्जिकल स्ट्राइक करणार आहेत. महाराष्ट्र सैनिकांनो तयार रहा, अशा आशयाचे पोस्टर सध्या मनसेच्या गटात व्हायरल होत आहे. युतीच्या घोषणेनंतरही गेले कित्येक दिवस शांत बसलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्यावरून भाजप सरकारला लक्ष्य केले होते. पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवान राजकीय बळी असू शकतात, असा हल्लाबोल राज यांनी केला होता. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता येत्या शनिवारी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांची मुंबईत सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर 'राज'कीय सर्जिकल स्ट्राइक, महाराष्ट्र सैनिकांनो तयार राहा,' अशा आशयाचे पोस्टर्स सर्वत्र व्हायरल झाले आहेत. आम्ही राजधर्म पाळणार असल्याचा संदेशही मनसेच्या अधिकृत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येत्या शनिवारी सायंकाळी ५ वाजता राज ठाकरे यांची वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सभा होणार आहे, असा उल्लेख आहे. तसेच मनसे लोकसभा निवडणुकीत कोणासोबत जाणार? ही मनसेची भूमिका देखील राज ठाकरे या सभेत स्पष्ट करतील.

undefined

Intro:मनसे करणार वर्धापनदिनी राजकीय सर्जिकल स्ट्राईक
मुंबई - सर्जिकल स्ट्राइकवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी 9 मार्च रोजी पक्षाच्या 13 व्या वर्धापन दिनी राजकीय सर्जिकल स्ट्राइक करणार आहेत, महाराष्ट्र सैनिकानो तयार रहा अशा आशयाचे पोस्टर सध्या मनसेच्या गटात वायरल होत आहे. युतीच्या घोषणेनंतरही गेले कित्येक दिवस शांत बसलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Body:राज ठाकरे यांनी पुलवामा हल्ल्यावरून भाजप सरकारला लक्ष्य केले होते. पुलवामा हल्ल्यातील शहीद हे राजकीय बळी असू शकतात, असा हल्लाबोल राज यांनी केला होता. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर
आता येत्या शनिवारी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांची मुंबईत सभा होतेय. या पार्श्वभूमीवर 'राज'कीय सर्जिकल स्ट्राइक, महाराष्ट्र सैनिकांनो तयार राहा,' अशा आशयाचे पोस्टर्स सर्वत्र व्हायरल झाले आहेत. तर आम्ही राजधर्म पाळणार असा संदेशही मनसेच्या अधिकृत सोशल मीडियावर वायरल होत आहे. Conclusion:येत्या शनिवारी, 9 मार्च रोजी संध्याकाळी पाच वाजता राज ठाकरे यांची वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सभा होणार आहे, असा उल्लेख आहे.
तसेच मनसे लोकसभा निवडणुकीत कोणासोबत जाणार ही मनसेची भूमिका देखील राज ठाकरे या सभेत स्पष्ट करतील.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.