मुंबई - अन्याविरोधात विद्यार्थी आवाज उठवणार असतील तर त्यांचे चुकले कोठे? लोकशाही मजबूत करण्याचे काम विद्यार्थ्यांनीच केले आहे. जेएनयुमधले विद्यार्थी हे त्यांच्या हक्कासाठी लढत आहेत. मात्र, गुंड पाठवून त्यांच्यावर हल्ला केला जात असल्याचे म्हणत आमदार कपिल पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारच्या परवानगीनेच या गुंडांनी विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचे पाटील म्हणाले. तसेच मोदी-शाह यांचे हे सरकार दडपशाही करणार असल्याचेही पाटील म्हणाले.
जेएनयुमधील विद्यार्थ्यांनी फी कमी करण्याची मागणी केली होती. त्यांची न्याय मागणी होती. या संदर्भात विद्यार्थ्यांशी चर्चा करायला हवी होती. मात्र, तोंडाला मास्क लावून काही गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला. देशात प्रथमच असे घडल्याचे कपिल पाटील म्हणाले. मात्र, सरकारच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या जेएनयुच्या विद्यार्थ्यांचे स्वागत करायला हवे, कारण ते लोकशाही मजबूत करण्याचे काम करत आहेत.
दिल्ली पोलीस मोदी शाहंची
दिल्ली पोलीस ही कटपुतळी आहे. ही पोलीस मोदी शाहंची ऐकण्यातली असल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला. एबीव्हीपीचे कार्यकर्ते नंगा नाच करत असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे पाटील म्हणाले.