मुंबई Mumbai High Court : बलात्काराचे समर्थन करण्यासाठी निकाह केला असे मान्य करता येत नाही, असे म्हणत याबाबतचे आदेशपत्र 23 डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेले आहे. मुंबईमध्ये दोन वर्षांपूर्वी इमरान खान या सव्वीस वर्षे तरुणाने त्याच्याच समुदायातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. (rejected bail application of accused) त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी आरोपी इमरान खान याच्यावर गुन्हा दाखल केला. खटला मुंबईच्या दिंडोशी सत्र न्यायालयात दाखल झाला. दिंडोशी सत्र न्यायालयाने याबाबत त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला होता. त्यामुळे त्याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र, बलात्कार करून त्या मुलीशी लग्न केले आहे, असा बहाणा कायद्यासमोर चालू शकत नाही. सबब त्याचा जामीन अर्ज न्यायमूर्ती जी ए सानप यांनी फेटाळून लावलेला आहे.
आरोपीची बाजू, त्यांचे प्रेमसंबंध होते : आरोपी इमरान खान याला जामीन मिळावा, यासाठी त्याचे वकील खलिद गुजर यांनी मुद्दा मांडला की, मुलगी अल्पवयीन आहे. परंतु, इमरान खान आणि पीडिता त्यांचे प्रेम संबंध होते. पीडिता जी मुलगी आहे तिच्या संमतीने हे लैंगिक संबंध झालेले आहे. त्यामुळे एकट्या आरोपीला या संदर्भात दोष देता येणार नाही.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार सहमतीने कसा असू शकेल? : पीडित मुलीची बाजू मांडणाऱ्या तक्रारदारातर्फे वकिलांनी न्यायालयासमोर ठोसपणे बाजू मांडली की, जी अल्पवयीन मुलगी आहे आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार होतो, ती त्याला कशी सहमती देऊ शकते. ती लग्नाला स्वतः देखील कशी सहमती देऊ शकते? त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात आरोपीचा जामीन नाकारण्याजोगीच वस्तुस्थिती समोर येत असल्याचे नमूद केले.
निकाहच्या आड लपून बलात्काराचे समर्थन अमान्य : दोन्ही पक्षाकारांची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती जी एस सानप म्हणाले, जामीन मिळण्यासाठी जो अर्ज केलेला आहे, त्यामध्ये असं कुठे नमूद केलेलं नाहीये की, पीडितासोबत आरोपी इमरान याने मुस्लिम कायद्यानुसार लग्न केलेलं आहे. त्यामुळे निकाहनामा हा सिद्ध होऊ शकत नाही आणि बलात्काराचे समर्थन करण्यासाठी निकाह हे कारण होऊ शकत नाही. त्यामुळे हा जामीन अर्ज नामंजूर केला जात आहे.
हेही वाचा: