मुंबई – राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची बाधा झाली होती.
नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोनाची चाचणी करून घ्यावी. आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईन, असे त्यांनी ट्विट करून म्हटले आहे.
-
नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोणाची चाचणी करून घ्यावी.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) October 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोणाची चाचणी करून घ्यावी.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) October 29, 2020नुकतीच माझी करोना चाचणी करण्यात आली असून, त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. माझी प्रकृती उत्तम असून कसलाही त्रास नाही. खबरदारीचा उपाय म्हणून मी डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी दक्षता म्हणून कोरोणाची चाचणी करून घ्यावी.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) October 29, 2020
खडसेंच्या पक्षप्रवेश सोहळ्याला होते उपस्थित
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी खडसेंच्या पक्षप्रवेश सोहळा मुंबईच्या राष्ट्रवादी कार्यालयात घेण्यात आला होता. यावेळी शरद पवारांपासून राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यामुळे सर्वांना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात मोजक्याच लोकांना आमंत्रण होते.