ETV Bharat / state

राज्यातील रुग्ण अर्धशतकाजवळ; 31 मार्चपर्यंतचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा - कोविड-19 लेटेस्ट न्यूज़ मुंबई

कोरोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र, गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत. प्रत्येकाने काळजी घ्यावी, घरी सुरक्षित रहावे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. हा आजार दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच 31 तारखेपर्यंतचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे आरोग्यमंत्री म्हणाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Mar 19, 2020, 2:15 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 49 वर पोहचली आहे. म्हणून 31 मार्चपर्यंतचे पुढील 10 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते येथे माध्यमांशी बोलत होते.

कोरोनाग्रस्तांची संख्या ही सुरुवातीला कमी होती. मात्र, गेल्या चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत. प्रत्येकाने काळजी घ्यावी, घरी सुरक्षित रहावे. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. हा आजार दुसऱ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच 31 तारखेपर्यंतचे दहा दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे आरोग्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा - कोरोनाचा धसका : आखाती देशातून 26 हजार भारतीय मुंबईत परतणार, होम क्वारेंटाईनसाठी बिल्डरांच्या रिक्त इमारतींचा वापर

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 49 वर पोहचली आहे. यात 48 वा रुग्ण 22 वर्षांची महिला तर 49 वा रुग्ण 51 वर्षांचा पुरुष आहे. तो अहमदनगरचा आहे. तसेच त्याच्या प्रवासाचा इतिहास अहमदनगरचा आहे. तसेच यात 12 तासात चार नवे रुग्ण आढळले आहेत. संसर्ग होण्याचे प्रमाण 50 मध्ये 10 असे आहे. म्हणून संसर्ग होऊ नये, याची आम्ही दक्षता घेत आहोत, असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.