ETV Bharat / state

Maharashtra Politics : 'ये फेविकॉल जोड है, तुटेगा नहीं', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास ! - CM Eknath Shinde

राष्ट्रपती ( President ) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांचे मुंबईतील ( Mumbai Hotel ) फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये स्नेह भोजन पार पडले. उपमुख्यमंत्री फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी यावेळी आमदारांना मार्गदर्शन केले आहे.

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बैठक
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बैठक
author img

By

Published : Jul 17, 2022, 8:42 AM IST

Updated : Jul 17, 2022, 8:54 AM IST

मुंबई - राज्यातील घडामोडीमुळे शिवसेनेतून बंडखोरी गेलेल्या आमदार आणि भाजपच्या आमदारांमध्ये संभ्रम वाढला आहे. आपल्यात मतभेद निर्माण व्हावेत, असा विरोधकांचा डाव आहे. मात्र, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस फेविकॉलचा मजबूत जोड आहे. तुटेगा नहीं, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे ( CM Eknath Shinde ) उपमुख्यमंत्री फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) सेनेच्या बंडखोर आणि भाजपच्या आमदारांना दाखवत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

स्टार हॉटेलमध्ये स्नेह भोजन - राष्ट्रपती ( President ) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांचे मुंबईतील ( Mumbai Hotel ) फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये स्नेह भोजन पार पडले. उपमुख्यमंत्री फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) यांनी यावेळी आमदारांना मार्गदर्शन केले आहे.

मंत्रिपदावरुन रस्सीखेच - राज्यात शिंदे सरकार स्थापन झाल्यापासून 16 दिवसांचा कालावधी उलटून गेला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच मंत्रिमंडळ ( Cabinet ) बैठक घेत आहेत. आमदारांचे संख्याबळ असतानाही खाते वाटप केलेले नाही. मंत्रिपदावरुन सुरु असलेली रस्सीखेच, बंडखोर आमदारांकडून दररोज सुरु असलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे अनेक आमदार संभ्रमात आहेत. काहीजण उघडपणे मुख्यमंत्री शिंदेकडे व्यक्त होत आहेत. पंढरपूर आमदारांमध्ये अंतर्गत वाढल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने आमदारांच्या मनधरणीचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आपल्यात मतभेद करण्याचे अनेक जण प्रयत्न करतील, पण त्याला बळी पडू नका. कमी कालावधीत अधिक चांगले काम करू आणि राज्याला दाखवून देऊ. त्यामुळे काही दिवस स्थिर रहा, असा सल्ला दिल्याचे समजत आहे.

आपल्यासोबत भाजप आहे - माझ्यावर विश्वास ठेवून आलेल्या सगळ्या आमदारांच्या मतदारसंघातील प्रलंबित कामे लवकरच मार्गी लागतील. कुणाला मंत्री केले नाही, म्हणून मतभेद निर्माण केले जातील, त्याला बळी पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. तसेच आपआपल्या मतदारसंघाकडे लक्ष द्या, अशा सूचनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी सगळ्या आमदारांना दिल्या आहेत. सगळ्यांना पुन्हा निवडणून आणायचे आहे. त्यातही आपल्यासोबत भाजप आहे. त्यामुळे घाबरू नका, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी मन वळवण्याचा प्रयत्न केला. तसेच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपाचे एकही मत बाद होणार नाही, याची काळजी घ्या. द्रौपदी मुर्मु मोठ्या मताधिक्याने निवडणून यायला हव्यात, त्यात जास्त मते आपल्या राज्याची त्यांना पडायला हवीत, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याचे समजत आहे.

हेही वाचा - CM Eknath Shinde : ठाण्यात उद्धव ठाकरेंना 'धक्के पे धक्का'; झेडपीच्या अध्यक्षासह १५० नगरसेवक शिंदे गटात सामील

Last Updated : Jul 17, 2022, 8:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.