ETV Bharat / state

मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी माध्यम कक्षाची स्थापना; 'असे' चालते कामकाज

माध्यम कक्षांचे मुख्य समन्वय अधिकारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वरिष्ठ सहाय्यक संचालक डॉ. राजू पाटोदकर आहेत. तसेच ते या संपूर्ण लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत होणाऱ्या आचारसंहिता भंग व प्रचार कार्यावर लक्ष ठेवतात.

माध्यम कक्ष
author img

By

Published : Apr 13, 2019, 5:12 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत दक्षिण-मध्य मुंबई आणि दक्षिण-मुंबई हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी शहर जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता लागू झाल्यानंतर माध्यम कक्ष स्थापित करण्यात आले आहे.

माध्यम कक्षातील कामकाज

या कक्षात इलेक्ट्रॉनिक, सोशल, प्रिंट, रेडिओ,आदी प्रसार माध्यमांच्या संदर्भात नियंत्रण केले जाते. या माध्यम कक्षांचे मुख्य समन्वय अधिकारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वरिष्ठ सहाय्यक संचालक डॉ. राजू पाटोदकर आहेत. तसेच ते या संपूर्ण लोकसभा निवडणूक २०१९ अंतर्गत होणाऱ्या आचारसंहिता भंग व प्रचार कार्यावर लक्ष ठेवतात.

इलेक्ट्रॉनिक्स मीडिया -
माध्यम कक्षात विविध भाषीक चॅनेल्सवरील बातम्यांचे अवलोकन करण्यासाठी व्हिडिओ मॉनिटरिंग तयार करण्यात आले आहे. या कक्षाचे नोडल ऑफिसर म्हणून फिल्म टेलिव्हिजनचे मुख्य छायाचित्रकार रवींद्र पाटील आहेत. त्यांच्या नियंत्रणाखाली ६ कर्मचारी ९ चॅनल्सचे अवलोकन करतात. उमेदवार आणि लोकसभा मतदारसंघाबाबत काही माहिती प्रसारित झाल्यास त्याची तातडीने नोंद या कक्षामार्फत घेतली जाते.

प्रिंट मीडिया -
मराठी, हिंदी, गुजराती, उर्दू आणि इंग्रजी भाषेतील जवळपास ३० वर्तमानपत्रांचे या कक्षात दररोज अवलोकन केले जाते. प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि जाहिरात यांचे कात्रणे काढली जातात. तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे संबंधित बातमी अवलोकनार्थ पाठवण्यात येते. तसेच काही जाहिराती असल्यास त्याच्या खर्चाचा अहवाल संबंधित निवडणूक खर्च विभागाकडे पाठविण्याचे काम या कक्षामार्फत करण्यात येते. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील या कक्षाचे प्रमुख आहेत.

सोशल मीडिया -
सोशल मीडिया अंतर्गत व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर तसेच उमेदवारांच्या फेसबुक पेज आणि ट्विटर हँडलचे अवलोकन करण्यात येते. यामध्ये काही आक्षेपार्ह आणि विनापरवानगी मजकूर प्रकाशित झाल्यास संबंधित उमेदवारांच्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळवण्यात येते. तसेच विनापरवानगी कोणताही मजकूर प्रसिद्ध होऊ नये, याबाबत सक्त सुचना देण्याचे काम या कक्षामार्फत करण्यात येते. रेडिओ बाबतीतही या कक्षात नियंत्रण केले जाते. फिल्म डिव्हिजन शाखा व्यवस्थापक अवधेश कुमार महाराजावर आणि पत्र सूचना कार्यालयाच्या भावना गोखले या कक्षाच्या प्रमुख आहेत.

माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती -
जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या समितीचे कामकाज चालते. या समितीचे सदस्य सचिव पाटोदकर आहेत. अशाच प्रकारची स्वतंत्र समिती दक्षिण-मध्य मुंबई आणि दक्षिण-मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी स्थापन करण्यात आली आहे. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी हे समितीचे अध्यक्ष आहेत. लोकसभा मतदारसंघाच्या माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार आहेत.

Intro:लोकसभा निवडणूक 2019साठी निवडणूक आयोगाची मीडिया रूम कसं कार्यकर्ते

लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यात 30 मुंबई दक्षिण मध्य व 31 मुंबई दक्षिण हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत या दोन्ही लोकसभा मतदारसंघासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता लागू झाल्यानंतर माध्यम कक्ष स्थापित करण्यात आले आहे या पक्षात इलेक्ट्रॉनिक सोशल प्रिंट रेडिओ अधिक प्रसार माध्यमांच्या संदर्भात नियंत्रण केले जाते या माध्यम कक्षांचे मुख्य समन्वय अधिकारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे वरिष्ठ सहाय्यक संचालक डॉक्टर राजू पाटोदकर हे या संपूर्ण लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत होणाऱ्या आचारसंहिता भंग व प्रचार यांच्यावर लक्ष ठेवतात

इलेक्ट्रॉनिक्स मीडिया

माध्यम कक्षात विविध भाषिक चॅनेल्सवरील बातम्यांचे अवलोकन करण्यासाठी व्हिडिओ मोनिटरिंग तयार करण्यात आली असून या कक्षाचे प्रमुख नोडल ऑफिसर म्हणून फिल्म टेलिव्हिजन चे मुख्य छायाचित्रकार श्री रवींद्र पाटील हे आहेत त्यांच्या नियंत्रणाखाली दोन शिफ्टमध्ये सहा कर्मचारी नऊ चॅनलचे अवलोकन करीत आहेत उमेदवार व लोकसभा मतदारसंघाबाबत काही माहिती प्रसारित झाल्यास त्याची तातडीने नोंद या कक्षामार्फत घेतली जाते व पुढील कार्यवाही संबंधित विभागाकडे पाठविले जाते

प्रिंट मीडिया

मराठी हिंदी गुजराती उर्दू इंग्रजी भाषेतील जवळपास तीस वर्तमानपत्रांचे या कक्षात दररोज अवलोकन केले जाते प्रकाशित होणाऱ्या बातम्या व जाहिरात यांचे कात्रणे काढली जातात तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे संबंधित वृत्त बातमी अवलोकनार्थ पाठवण्यात येते तसेच काही जाहिरात असल्यास त्याच्या खर्चाचा अहवाल संबंधित निवडणूक खर्च विभागाकडे पाठविण्याचे काम या कक्षामार्फत करण्यात येते या पक्षाचे प्रमुख तथा नोडल ऑफिसर म्हणून मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी पी डी पाटिल हे कार्यरत आहेत

सोशल मीडिया

सोशल मीडिया अंतर्गत व्हाट्सअप फेसबुक ट्विटर तसेच उमेदवारांचे फेसबुक पेज ट्विटर हँडल अवलोकन करण्यात येते की यामध्ये काही आक्षेपार्ह व विनापरवानगी मजकूर प्रकाशित झाल्यास संबंधित उमेदवारांच्या बाबत निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळविण्यात येते तसेच विनापरवानगी कोणती मजकूर प्रसिद्ध होऊ नये याबाबत सक्त सूचना देण्याचे काम या कक्षामार्फत करण्यात येते तसेच रेडिओ बाबतीतही या कक्षात नियंत्रण केले जाते कक्षाचे प्रमुख म्हणून फिल्म डिव्हिजन शाखा व्यवस्थापक अवधेश कुमार महाराजावर पत्र सूचना कार्यालयाचे भावना गोखले यावर काम कार्य करतात

माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती

मुंबई शहर जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार या समितीचे कामकाज चालते या समितीचे सदस्य सचिव पाटोदकर आहेत अशाच प्रकारची समिती 30 मुंबई दक्षिण-मध्य व्यक्तीस मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र स्थापन करण्यात आली आहे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी हे समितीचे अध्यक्ष आहेत तीच मुंबईमध्ये लोकसभा मतदारसंघाच्या माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारी शहाजी पवार आहेत 30 दक्षिण मध्य मुंबईसाठी जानेवारी विवेक राव आहे तर 31 मुंबई दक्षिण साठी कपालिनी सिनकर या कार्य करतात या समित्यांमार्फत न्यूज तपास न्यूज यांच्याकडे लक्ष ठेवले जातेBody:।Conclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.