ETV Bharat / state

Measles outbreak : मुंबईत गोवरचा उद्रेक, संशयित रुग्णांचा आकडा ३८३१ वर, ३ रुग्ण व्हेंटिलेटवर - Measles Patient in Mumbai

मुंबईत गोवरच्या रूग्णसंख्येत ( Measles Patient in Mumbai ) आतापर्यंत एकूण २६० रुग्णांची तर ३८३१ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईमधील रुग्णालयात आतापर्यंत एकूण १३ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १० मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहे. मुंबईमधील एकूण १० मृत्यूपैकी ८ जणांचा मृत्यू गोवारमुळे झाला आहे. २ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 25, 2022, 9:46 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने ( Measles outbreak in Mumbai ) वाढत आहे. आतापर्यंत एकूण २६० रुग्णांची तर ३८३१ संशयित रुग्णांची नोंद ( Measles Patient in Mumbai ) झाली आहे. आतापर्यन्त एकूण १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी १० मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबई बाहेरील आहे. १९ रुग्ण ऑक्सीजनवर, ५ रुग्ण आयसीयुमध्ये तर ३ रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

१९ रुग्ण ऑक्सिजनवर, ३ व्हेंटिलेटवर - मुंबईत ४८ लाख ७३ हजार ७३३ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ३८३१ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे २६० रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी कस्तुरबा, गोवंडी शिवाजी नगर प्रसूती गृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, राजावाडी, शताब्दी, सेव्हन हिल, कुर्ला भाभा , क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय बोरिवली आदी रुग्णालयात ३३० बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी १०३ बेडवर रुग्ण असून २२७ बेड रिक्त आहेत. १४१ जनरल बेडपैकी ७९, १५४ ऑक्सीजन बेड पैकी १९, ३५ आयसीयु बेड पैकी ५ तर २० व्हेंटिलेटर पैकी ३ व्हेंटिलेटरवर रुग्ण आहेत. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात २० हजार ७४४ मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

मुंबईत १० तर बाहेरील ३ मृत्यू - मुंबईमधील रुग्णालयात आतापर्यंत एकूण १३ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १० मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहे. मुंबईमधील एकूण १० मृत्यूपैकी ८ जणांचा मृत्यू गोवारमुळे झाला आहे. २ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाला आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

या उपाययोजना - गोवर रुग्ण शोधण्यासाठी घराघरात जाऊन भेटी दिल्या जात आहेत. दैनंदिन सर्व्हेक्षण करून ॲटिव्ह रुग्ण शोधून काढत आहोत. संशयित रुग्णांना व्हिटॅमिन "अ" दिले जात आहे. यामुळे मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते तसेच मृत्यूचे प्रमाण रोखणे शक्य होते. लसीकरण झाले नाही, वजन कमी, दाटीवाटीने राहणारे लोक, एकाच घरात जास्त संख्येने मुलं असणे, रक्तक्षय, अँनिमिया यामुळे मृत्यू वाढू शकतात. यासाठी व्हिटॅमिन "अ" देणे, लक्षणे दिसल्यास रुग्णालय भरती करणे, त्यांच्यावर ताबडतोब उपचार करणे या उपाययोजना केल्या तर मृत्यूचे प्रमाण रोखता येवू शकते. मुलांना वेळेवर लसीकरण करणे हे सुध्दा महत्वाचे आहे. विविध रुग्णालयात ३३० बेडस तयार आहेत. त्यापैकी बहुतेक बेड रिक्त आहेत. आयसीयु आणि व्हेंटिलेटर तयार आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.