ETV Bharat / state

मुंबईतील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट होणार - महापौर - मुंबई रुग्णालये फायर ऑडिट न्यूज

अनेक नर्सिंग होम आणि सर्वसाधारण रुग्णालयांना अग्निसुरक्षेचे प्रमाणपत्रही नाही. काहींमध्ये ही यंत्रणा असली तरी त्याची मुदत संपली आहे. त्यामुळे खासगी आणि पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णसुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. भंडारा रुग्णालयातील दुर्घटनेनंतर मुंबई पालिका रुग्णालयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. यानंतर खडबडून जागे झालेल्या मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील खासगी, शासकीय रुग्णालयांच्या फायर ऑडिट करण्यासाठी आदेश दिले आहेत.

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर न्यूज
मुंबई महापौर किशोरी पेडणेकर न्यूज
author img

By

Published : Jan 23, 2021, 5:15 PM IST

मुंबई - भंडारा येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई पालिका रुग्णालयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. यानंतर खडबडून जागे झालेल्या मुंबई महानगरपालिकेने मुंबईतील खासगी, शासकीय रुग्णालयांच्या फायर ऑडिट करण्यासाठी आदेश दिले आहेत. एका महिन्याच्या आत ही माहिती जमा करावी, असे सांगितले आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी पेडणेकर आल्या होत्या. त्यावेळी त्या माध्यमाशी बोलत होत्या.

मुंबईतील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट होणार - महापौर
अनेक नर्सिंग होम आणि सर्वसाधारण रुग्णालयांना अग्निसुरक्षेचे प्रमाणपत्र देखील नसल्याचे दिसून येत आहे. काहींमध्ये ही यंत्रणा असली तरी त्याची मुदत संपल्याचे दिसून येते. त्यामुळे खासगी आणि पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने फायर ऑडिटचे आदेश अग्निशमन दलाला दिलेले आहेत.

हेही वाचा - गेल्या वर्षी कोरोनापेक्षा अधिक मृत्यू रस्ते अपघातांमुळे; वाहतूक उपायुक्तांची माहिती

साध्या पद्धतीने होणार कार्यक्रम

बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकार्पण आज त्यांच्या 95 व्या जयंतीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अनेक नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका व्यासपीठावर दिसणार आहेत. हा कार्यक्रम हा साध्या पद्धतीने होणार आहे. मुख्यमंत्री अनावरण करणार आहेत, अशी माहिती महापौर यांनी दिली आहे.

कोणी कोणाच्या भेटी घेऊ द्या, काही होत नाही

भाजप नेते आणि देवेंद्र फडवणीस यांचे जवळीक असलेले प्रसाद लाड यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक चर्चेला उधाण आले आहे. कोणी कोणाच्या भेटी घेऊ द्या. काही होत नाही. उद्या परीक्षा म्हणून आज अभ्यास केला जात नाही. कोणी काहीही करू द्या, काही होत नाही, असे मत या भेटीवर महापौर पेडणेकर यांनी व्यक्त केले आहे.

महापालिका बॉण्ड काढण्याच्या विचारात

मुंबई महानगरपालिका भविष्यात बॉन्ड मार्केटमध्ये आपला बॉण्ड आणण्याच्या तयारीत आहे. याबाबत अधिकाऱ्यांच्या चर्चा सुरू आहेत. अशी माहिती देखील पेडणेकर यांनी दिली.

हेही वाचा - प्रलंबित नोकर भरतीसाठी राज्य सरकारकडून सुरुवात; भरतीला मराठा नेत्यांचा विरोध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.