ETV Bharat / state

Maratha Reservation Suicide : मराठा आरक्षणासाठी तब्बल 'इतक्या' आत्महत्या; मराठवड्यात प्रमाण जास्त - Maratha Reservation Suicide

Maratha Reservation Suicide : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation Protest) मिळावं म्हणून महाराष्ट्रात मराठा समाज आग्रही आहे. याच आरक्षणाची मागणी होत असताना अनेक मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे मागील १५ दिवसात एकूण २० तरुणांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्या आहेत.

Maratha Reservation
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 6:19 PM IST

मुंबई Maratha Reservation Suicide : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation Protest) मुद्दा चांगलाच तापलाय. पहिल्या टप्प्यातील उपोषणानंतर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दुसऱ्या टप्प्यात नऊ दिवसांचं उपोषण केलं होतं. नवव्या दिवशी त्यांनी सरकारला काही दिवसांची मुदत देत उपोषण सोडलं. मात्र, जरांगे पाटील यांच्या दुसऱ्या टप्पातील उपोषणावेळी मराठा तरुण आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. तर मागील १५ दिवसात एक-दोन नाही तर तब्बल २० जणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीये.

मराठवाड्यात १६ जणांच्या आत्महत्या : मराठा आरक्षणासाठी मागील १५ दिवसात २० जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. तर एकट्या मराठवाड्यात १६ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. यात हिंगोलीतील एका अल्पवयीन मुलीचा देखील समावेश आहे. पुणे, अहमदनगर, जालना, हिंगोली, आळंदी, छत्रपती संभाजीनगर, धारशीव, बीड आदी भागात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडल्या आहेत. २० ऑक्टोबर ते ३ नोंव्हेबरपर्यंत मागील पंधरा दिवसातील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्यांची आकडेवारी समोर आलीये.

आळंदीत शुक्रवारी तरुणाची आत्महत्या : मिळालेल्या माहितीनुसार, मराठवाड्यात मागील 15 दिवसांत 16 तरुणांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्या आहेत. तर राज्यात मागील 15 दिवसांत 20 तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये जालन्यात उपोषण सुरू असतानाच मंडपातून उठून थेट घरी जात शिवाजी किसन माने या तरुणानं आत्महत्या केली. छत्रपती संभाजीनगरमधील आपतगाव येथे गणेश काकासाहेब कुबेर या तरुणाने आत्महत्या केली होती. तर हिंगोलीत मराठा आरक्षण मिळत नसल्यानं आत्महत्या करत आहे, अशी चिठ्ठी लिहून लहू उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर याने आत्महत्या केली.

स्टेटस ठेवून जीवन संपवलं : धाराशिव जिल्ह्यातील डोमगाव येथील शेतकरी बळीराम देविदास साबळे यांनी आत्महत्या केली. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील शत्रुघ्न काशीद याने आत्महत्या केली होती. लातूर जिल्ह्यातील ढाळेगाव येथील ग्रामपंचायत सदस्यानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली. "दुष्काळ जगू देत नाही आणि आरक्षण शिकू देत नाही," असे स्टेटस ठेवून तरुणाने स्वतःच जीवन संपवलं. शुक्रवारी पुण्यातील आळंदीत सिद्धेश्वर सत्यवान बर्गे या अवघ्या २१ वर्षीय तरुणानं मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने जीवन संपवलं आहे. सिद्धेश्वरने स्वतःच्या दुकानात चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. 'मी मराठा बांधवांसाठी पाऊल उचलत आहे, कुणीही कोणाला दोष देऊ नये. फक्त माझ्या सोन्या, आप्पा, जीजी, आईला सांभाळा', असं चिठ्ठील लिहिलं होतं.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : सामाजिक मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण नाही
  2. Maratha Reservation : कुणबी समितीबाबत राज्य सरकारनं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय, मनोज जरांगे पाटील यांनी केली होती मागणी
  3. Maratha Protest : मनोज जरांगे पाटलांचं उपोषण अखेर मागं; 'डेडलाईन' 2 जानेवारी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.