मुंबई Maratha Reservation : पूर्वी माधव (माळी, धनगर आणि वंजारी) हा फॉर्म्युला अत्यंत प्रसिद्ध होता. परंतु, आता 'माधव गेला कुणीकडे' असं म्हणायची पाळी आलीय. कारण माधवमधल्या धनगर आणि वंजारी यांना आरक्षण मिळालंय. मात्र, माळी समाजाला अद्याप आरक्षण मिळालेलं नाही. मात्र, आता या मराठा समाजाच्या आरक्षणाबरोबर त्यांनासुद्धा आरक्षण मिळू शकतं. अशी एक चांगली संधी आलेली आहे. तसंच आता माळी, तेली, आगरी आणि भंडारी या समाजाला देखील आरक्षण मिळू शकतं, असा दावा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केलाय.
50% च्या आत मराठा समाजाला आरक्षण : पुढं माजी खासदार राठोड म्हणाले, मराठा आरक्षणाचा प्रश्न आता अत्यंत जटिल झालाय. मात्र मराठा समाजालाही 50 टक्क्यांत आरक्षण मिळू शकतं. अगदी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देता येऊ शकतं, हे मी किती दिवसापासून सांगतोय. अशा पद्धतीनं बारा बलुतेदारांना आपण वेगळं आरक्षण देऊ शकतो. यापूर्वी 1994 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात सब कॅटेगरीशन झालेलं आहे. आता देशात जस्टीस रोहिणी कमिशन म्हणून जे नावारूपाला येतंय, तेसुद्धा पंतप्रधानांनी केलं होतं. त्यामुळं आज मराठा आरक्षण मिळू शकतं, हे माझं मत आहे. वारंवार मी तेच सांगतोय. त्याविषयीचा फॉर्म्युला तयार आहे. मात्र यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आणि सर्व संघटनांनी एकत्र बसण्याची गरज आहे. हा निर्णय होऊ शकतो मात्र सरकारनं त्यासाठी इच्छाशक्ती दाखवण्याची गरज आहे.
सध्या जरांगे पाटलांच्या निमित्तानं महाराष्ट्रात जे आंदोलन आणि वादळ सुरू आहे, त्या संदर्भात ओबीसी किंवा मराठा समाजांनी परस्परांसंदर्भात कोणतीही विधानं करू नयेत. हा प्रश्न शांततेच्या मार्गानं एकत्र बसून सोडवावा आणि तो सुटू शकतो-माजी खासदार हरिभाऊ राठोड
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार काय म्हणाले : या मुद्द्यावर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांन देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले की, मराठवाड्यात माळी, धनगर आणि वंजारी समाज मोठ्या प्रमाणात आहे. या समाजाला एकत्र करून प्रतिनिधी निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय नेत्यांनी 'माधव' हा फॉर्म्युला तयार केलाय. मात्र याच 'माधव'ला जेव्हा काही देण्याची वेळ येते. तेव्हा मात्र आखडता हात घेतला जातो. सध्याच्या आरक्षणाच्या या संपूर्ण रणसंघर्षात माधव फॉर्मुल्यातील धनगर आणि वंजारी हे जरी शांततेच्या भूमिकेत असले तरी माळी समाजानं आपली आक्रमकता दाखवून दिली आहे. छगन भुजबळांच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाला कसलाही धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावं. ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण दिले जाऊ नये अशी भूमिका घेण्यात आली आहे.
हेही वाचा -