ETV Bharat / state

'असे' आहे लालबाग, गणेशगल्ली, चिंतामणी गणपती परिसरातील नियोजन - लालबाग

मुंबईतील बाप्पा पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक गर्दी करत असतात. आज बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. त्यामुळे लालबाग-परळमध्ये गणोशोत्सवासाठी भक्तांची प्रचंड गर्दी पहिल्या दिवसापासूनच पहायला मिळाली आहे.

भाविकांची गर्दी
author img

By

Published : Sep 2, 2019, 1:13 PM IST

मुंबई - मुंबईतील बाप्पा पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक गर्दी करत असतात. आज बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. त्यामुळे लालबाग-परळमध्ये गणोशोत्सवासाठी भक्तांची प्रचंड गर्दी पहिल्या दिवसापासूनच पाहायला मिळाली आहे. लालबाग व परेल या परिसरात लालबागचा राजा, गणेशगल्ली, चिंतामणी खेतवाडी १४ गल्लीतील गणपती पाहण्यासाठी भाविक गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व मंडळांकडून काळजी घेण्यात आली आहे. तसेच कशाप्रकारे या ठिकाणी आरत्या व पूजापाठ असणार आहे.

भावना व्यक्त करताना भाविक

गणपतीची दिवसातून ४ वेळा आरती केली जाते. सकाळी आणि सायंकाळी दोन वेळा या वेळेत दर्शन बंद केले जाते. लालबाग, चिंतामणी, गणेशगल्लीमध्ये गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या काळात बाप्पांची दररोजच्या आरतीचा मान खास लोकांना देण्याची या मंडळाची परंपरा आहे. गणेशोत्सवाच्या काळात रात्रंदिवस राबणारे पोलीस, सफाई कर्मचारी, परिचारिका, दूध विक्रेते, अग्निशमन दलाचे कर्मचारी यांना मुंबईच्या लालबागच्या राजाचे व इतर गणपती मंडळाचा आरतीचा मान दिला जातो. याचे नियोजन गणेशोत्सवाच्या आधीच करून ठेवलेले असते. ज्या लोकांना आरतीचा मान आहे, त्या लोकांना त्याची सूचनाही देण्यात येते. हा सन्मान त्यांच्या सेवेचा कर्तव्यभावनेचा आणि त्या विभागाचा असतो.

मंडळाकडून भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा पुरवल्या जातात. तसेच पोलिसांची देखील बारीक नजर आहे. गणेशमंडळ परिसरात सोनसाखळी चोऱ्या, विनयभंग असे रस्त्यांवरील गुन्हे वाढतात. घातपाताचाही धोका तितकाच असतो. स्थानिक पोलीस, सशस्त्र पोलीस, रॅपिड अॅक्शन फोर्स, एसआरपीएफ यांसह इतर दलांचा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात येणार आहे. होमगार्ड, मंडळाचे कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी यांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे.

लालबाग परळमध्ये मुंबईबाहेरून येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या माहितीसाठी यावेळी दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर भर देण्यात आले आहे. रेल्वे स्थानके, बस थांबे, मोनो रेल्वेची स्थानके तसेच नाक्यानाक्यावर मार्ग दाखविणारे, मदतीसाठीचे संपर्क क्रमांक, सावधानतेच्या सूचना अशी माहिती देणारे फलक लावण्यात आली आहेत. नागरिकांनी या सूचना पाळल्या तर सर्व सुरळीत होईल, अशी आशा आहे.

मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना यावेळी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये गर्दी नियंत्रण कशी करावी याचाही समावेश होता. त्यानुसार कार्यकर्ते देखील काम करताना दिसत आहेत. गर्दी वाढल्यास परिस्थितीनुसार पोलिसबळ वाढविण्यात येणार आहे. दर्शन घेतल्यानंतर भाविक लवकरात लवकर बाहेर कसे पडतील यावर मंडळाचा व पोलिसांची भर आहे. नागरिकांनी देखील गर्दीचा अंदाज घेऊन भाविकांना विविध सूचना ध्वनिक्षेपणाद्वारे देण्यात येत आहे.

Intro:जाणून घ्या कसं आहे लालबाग,गणेशगल्ली, चिंतामणी गणपती परिसरातील नियोजन

मुंबईच्या बाप्पा पाहण्यासाठी सर्वांचे आकर्षण असते.आज बाप्पाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे.त्यामुळे लालबाग-परळमध्ये गणोशोत्सवासाठी भक्तांची प्रचंड गर्दी आज पहिल्या दिवसापासूनच उसळली आहे. लालबाग व परेल या परिसरात लालबागचा राजा, गणेशगल्ली, चिंतामणी खेतवाडी 14 गल्लीतील गणपती पाहण्यासाठी भाविक गणेशोत्सव काळात मोठ्याप्रमाणात येतात त्यामुळे कोणतीही अपरीची काही घडू नये यासाठी सर्व मंडळांकडून काळजी घेण्यात आली आहे.तसेच कशाप्रकारे याठिकाणी आरत्या व पूजापाठ असणार आहे त्याबद्दल पुढे जाणून घ्या

गणपतीची दिवसातून 4 वेळा आरती केली जाते. सकाळी आणि सायंकाळी दोनदा यावेलेत दर्शन बंद केले जाते.लालबाग ,चिंतामणी ,गणेशगल्ली मध्ये गणेशोत्सवाच्या 10 दिवसांच्या काळात बाप्पांची दररोजच्या आरतीचा मान खास लोकांना देण्याची या मंडळाची परंपरा आहे. गणेशोत्सवाच्या काळात रात्रंदिवस राबणारे पोलीस, सफाई कर्मचारी, नर्सेस,दूध विक्रेते, फायरब्रिगेडचे कर्मचारी, यांना मुंबईच्या लालबागच्या राजाचे व इतर गणपती मंडळाचा आरतीचा मान दिला जातो. याचं नियोजन गणेशोत्सवाच्या आधीच करून ठेवलेलं असते ज्या लोकांना आरतीचा मान आहे त्या लोकांना त्याची सूचनाही देण्यात येते. हा सन्मान त्यांच्या सेवेचा कर्तव्याभावनेचा आणि त्या विभागाचा असतो.

तसेच मंडळाकडून भाविकांसाठी अनेक सोयीसुविधा पुरवल्या जातात.तसेच पोलिसांची देखील चोख नजर आहे गणेशमंडल परिसरात.
सोनसाखळी चोऱ्या, विनयभंग असे रस्त्यांवरील गुन्हे वाढतात. घातपाताचाही धोका तितकाच असतो. स्थानिक पोलिस, सशस्त्र पोलिस, रॅपिड ॲक्शन फोर्स, एसआरपीएफ यांसह इतर दलांचा फौजफाटा याठिकाणी तैनात ठेवण्यात येणार आहे. होमगार्ड, मंडळाचे कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी यांनाही सहभागी करून घेण्यात आले आहे.

तसेच लालबाग परळमध्ये मुंबईबाहेरून येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या माहितीसाठी यावेळी दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलकांवर भर देण्यात आले आहे. रेल्वे स्थानके, बस थांबे, मोनो रेल्वेची स्थानके तसेच नाक्यानाक्यावर मार्ग दाखविणारे, मदतीसाठीचे संपर्क क्रमांक, सावधानतेच्या सूचना अशी माहिती देणारे फलक लावण्यात आली आहेत. नागरिकांनी या सूचना पाळल्या तर सर्व सुरळीत होईल अशी आशा आहे.

मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना यावेळी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये गर्दी नियंत्रण कशी करावी याचाही समावेश होता त्यानुसार कार्यकर्ते देखील काम करताना दिसत आहेत. गर्दी वाढल्यास परिस्थितीनुसार पोलिससंख्या वाढविण्यात येणार आहे आणि भाविक लवकरात लवकर दर्शन घेऊन बाहेर कसे पडतील यावर मंडळाचा व पोलिसांची भर आहे.नागरिकांनी देखील गर्दीचा अंदाज घेऊन या परिसरामध्ये यावे आणि दर्शन झाल्यावर न रेंगाळता निघून जावे असे पोलिसांकडून वेळोवेळी माईकवर बोलून सांगण्यात येत आहे.

Body:Wkt आणि व्हिज्युअल मोजोवररून पाठवले आहेतConclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.