ETV Bharat / state

MVA Morcha Preparation : महामोर्चासाठी प्रतिक्षा पोलिसांच्या परवानगीची, तयारी मात्र जोरात सुरू - महामोर्चा पोलीस परवानगी

महाविकास आघाडी ( Mahvikas Aghadi ) कडून 17 डिसेंबरला मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईत ठिकठिकाणी या संदर्भामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ( Uddhav Balasaheb Thackeray group ) बॅनरबाजी करण्यात आली आहे. पोलिसांनी अद्याप या महामोर्चाला परवानगी दिली नसली (Police Permission Mahamorcha) तरीसुद्धा या महामोर्चाची तयारी जोरात सुरू आहे.

mahamorchya
महामोर्चाची तयारी जोरात सुरू
author img

By

Published : Dec 16, 2022, 3:18 PM IST

मुंबई : महापुरुषांचा सतत केला जाणारा अपमान ( Constant insults of great mens), सीमा प्रश्न व महागाई ( Border question and inflation ), बेरोजगारी हे सर्व प्रश्न घेऊन सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारचा ( Shinde Fadnavis government ) धिक्कार करण्यासाठी माहविकास आघाडी (Mahvikas Aghadi ) कडून मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी अद्याप या महामोर्चाला परवानगी दिली नसली तरी सुद्धा या महामोर्चाची तयारी जोरात सुरू आहे. मुंबईत ठीक ठिकाणी या संदर्भामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे.

मुंबईत ठिकाणी बॅनरबाजी : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच शिंदे - फडणवीस सरकारमधील नेते सतत महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य आणि गरळ ओकण्याचे काम करत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी कडून मुंबईत राणीचा बाग ते आझाद मैदान असा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चाला अद्याप पोलिसांनी परवानगी दिली नसली तरी या महामोर्चाची तयारी जोरात सुरू आहे. मुंबईत ठिकाणी या मोर्चाच्या संदर्भाने बॅनरबाजी करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांनी मुंबईभर बॅनरबाजी करायला सुरुवात केली आहे. या महामोर्चाला मुंबई सहित पालघर, पुणे, नवी मुंबई येथून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोक या महामोर्चात समाविष्ट होतील अशी शक्यता असून दीड ते दोन लाखापर्यंत लोक या महामोर्चात समाविष्ट होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शांततेच्यामार्गाने मोर्चा : या मोर्चात सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि जनताही मोठ्याप्रमाणावर सहभागी होणार आहेत. ज्यांचा पक्षाशी संबंध नाही. परंतु स्वाभिमान दुखावला गेला आहे, असेही लोक सहभागी होतील. अत्यंत सामंजस भूमिका सर्व पक्षांनी घेतली आहे. अनेक राजकीय पक्ष त्यात सहभागी होणार आहेत. ज्या ज्या वेळी बैठका घेण्यात आल्या त्या त्या वेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हजर होते. मोर्चाच्या दरम्यान तिथे शिस्त राहिली पाहिजे. तिथे कुठेही काहीही विध्वंसक होणार नाही. अतिशय शांततेच्यामार्गाने लोकशाहीत आपले मत प्रदर्शित करताना मोर्चा काढतो त्याचपध्दतीने हा मोर्चा काढणार आहोत, असे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले आहेत.

मोर्चा ऐतिहासिक करण्याच्या दृष्टीने प्रयत्न ? राज्यात नाट्यमय सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार गेले व राज्यात शिंदे - फडणवीस सरकार अस्तित्वात आले. हे नवीन सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर या सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचा हा पहिलाच महामोर्चा असल्याकारणाने या मोर्चाची तयारी महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांच्या प्रमुखांनी जोरात सुरू केली आहे. या मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी जरी नाकारली तरी हा मोर्चा निघणारच यावर हे सर्वच पक्ष ठाम असून हा मोर्चा ऐतिहासिक करण्याच्या दृष्टिकोनातूनही प्रयत्न केले जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.