मुंबई - काही दिवसांनी नवी मुंबईतील महानगर पालिकेत देखील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार असेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. ते माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले, नवी मुंबईतील कृषी उत्पन्न समितीवर महाविकास आघाडीचे पॅनल निवडून आले आहे. शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीवर विश्वास दाखवला आहे. तर भाजपला आपले पॅनलसुद्धा या निवडणुकीत उभे करता आले नाही. काही दिवसांत नवी मुंबईतील महानगर पालिकेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर काही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत. म्हणून काही दिवसांनी नवी मुंबई महानगर पालिकेत देखील महाविकास आघाडीची सत्ता असेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - 'गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभे आहे'