ETV Bharat / state

Maharashtra Political News : शिंदे-फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर; अजित पवारांची दांडी, चर्चांना उधाण - देवेंद्र फडणवीस दिल्ली दौरा

Maharashtra Political News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानक दिल्लीला गेले आहेत. या दौऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली आहे. त्यामुळं सरकारमध्ये अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 3, 2023, 8:24 PM IST

Updated : Oct 3, 2023, 8:58 PM IST

मुंबई : Maharashtra Political News : महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी वाढल्या असून, अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे आजच राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती व या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. यानंतर दिल्ली दरबारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच रवाना झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

सरकारमध्ये अजित पवार नाराज? : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे मंगळवारी सायंकाळी अचानक दिल्लीला रवाना झाले. त्यामुळं राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती हा मोठा चर्चेचा विषय झालाय. समोर आलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक करणार आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर : आठवड्याभरापूर्वीच गणपती दर्शनाच्या निमित्तानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे मुंबईमध्ये येऊन गेले होते. विशेष म्हणजे त्यांच्या मुंबई दौऱ्यातसुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्यासोबत कुठेही भेट झाली नव्हती. तसंच मंगळवारी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे गैरहजर राहिले होते. या कारणानं अजित पवार हे नाराज तर नाहीत ना? अशी चर्चा रंगली आहे. अजित पवार यांची नाराजी आणि राष्ट्रवादीकडून वाढता दबाव, हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामागचं कारण आहे काय? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

अजित पवार आजारी : अजित पवार यांनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी गणपती दर्शनाला हजेरी लावली होती. परंतु, त्यांच्या घराच्या काही अंतरावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपती दर्शनासाठी ते गेले नव्हते. यावरूनही बऱ्याच चर्चा रंगल्या आहेत. अशात मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी न लावता अजित पवार हे देवगिरी या आपल्या शासकीय बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची गाठभेट घेत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेच तसेच खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अजित पवार आजारी असल्याचे कारण पुढे करत असून, सध्याची परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

भाजपा मोठा भाऊ असल्याने...: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविना दिल्ली दौरा करत असल्यानं अनेक शंका निर्माण होत आहेत. अशातच मंगळवारी मुंबईत भाजपा प्रदेश पदाधिकारी व जिल्हा अध्यक्षांच्या बैठकीला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं होतं. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाचे सरकार असून, यामध्ये भाजपा मोठा भाऊ आहे. भाजपा हा मोठा भाऊ असल्याकारणानं त्यांना छोट्या भावाला सांभाळून घ्यावं लागतं. त्या गोष्टीसाठी येणाऱ्या दिवसात कदाचित त्यागही करावा लागणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

हेही वाचा -

  1. Asim Sarode On NCP Dispute : या' कारणानं अजित पवार गटातील आमदार अपात्र ठरतील, कायदेतज्ज्ञ असिम सरोदेंनी वर्तवलं भाकित
  2. Chhagan Bhujbal On Ajit Pawar Dispute : हो मी अजित पवारांशी मोठ्या आवाजात बोललो; मात्र... छगन भुजबळांनी सांगितलं खरं कारण
  3. Ajit Pawar VS Sharad Pawar : रोहित पवारांच्या कंपनीवर कारवाई; शरद पवार गट आक्रमक, आगामी निवडणुकीत 'रिटर्न गिफ्ट' देण्याचा इशारा

Last Updated : Oct 3, 2023, 8:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.