ETV Bharat / state

Ajit Pawar Meeting : 2024 मध्ये देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही - अजित पवार

राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार यांची एमईटीमध्ये आज स्वतंत्र बैठक सुरू झाली आहे. बैठकीच्या व्यासपीठावर ३० आमदार उपस्थित झाले आहेत. अजित पवार गटात जल्लोषाचे वातावरण दिसून येत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांचे फळांच्या हाराने स्वागत व्यासपीठावर झाले आहे.

Maharashtra Political Crisis
अजित पवार
author img

By

Published : Jul 5, 2023, 8:17 AM IST

Updated : Jul 5, 2023, 3:09 PM IST

अजित पवारांची आज बैठक

मुंबई : अजित पवार व्यासपीठावरून सभेला संबोधित करत आहेत. साहेबांना वाईट वाटले स्वाभाविक आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू येणे स्वाभाविक आहे. विठ्ठलाला बडव्यांना घेरले आहे, असा दावा भुजबळ यांनी केला आहे. कार्यकर्त्यांना वाईट वागणूक मिळाली आहे. नागालँडमध्ये आमदार हे भाजपमध्ये गेले. त्यांच्याप्रमाणे आमचा सत्कार नाही का? वसंतदादा यांना असेच वाईट वाटले, अशी आठवण भुजबळ यांनी करून दिली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवनिर्वाचित महिला आयोगाच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी निर्णयाला भरभक्कम पाठिंबा दिला. त्यानंतर धनंजय मुंडे, सुनिल तटकरे यांनी भाषणे केली. प्रफुल्ल पटेल म्हणाले इशारा समजला पाहिजे, अजूनही वेळ गेली नाही. आमच्या दैवताने आमची पण भावना समजून घ्यावी. आम्हाला आशिर्वाद द्यावा. जर शिवसेनेची आयडियोलॉजी स्वीकारू शकतो, तर भाजपची का नाही, असा सवालही पटेल यांनी केला.

  • #WATCH | NCP leader (Ajit Pawar faction) Praful Patel reaches MET Bandra to attend the party meeting called by Maharashtra Deputy CM Ajit Pawar.

    On the number of MLAs joining Ajit Pawar, NCP leader Praful Patel, says "We have everyone with us. There is no need to worry" pic.twitter.com/OvInxqcq8Y

    — ANI (@ANI) July 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एमईटी वांद्रे येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाप्रती निष्ठा दर्शवण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांकडून शपथपत्रे घेत आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांचे फळांच्या हाराने स्वागत होत आहे. कॅबीनेट मंत्री छगनराव भुजबळ कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडत आहेत. समर्थकांची अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी सुरू आहेत. अजित पवार बैठकीच्या ठिकाणी पोहोचले आहेत. अजित पवार यांची थोड्याच वेळात उपनगरातील वांद्रे येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या आवारात बैठक सुरू होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी प्रफुल्ल पटेल एमईटी वांद्रे येथे पोहोचले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी एमईटी वांद्रे येथे राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे.

अजित पवार हे व्यासपीठावर पोहोचले आहे. अजित पवार यांच्या बैठकीला 30 आमदार पोहोचले आहेत. मंत्रीपदांची शपथ घेतलेले सर्व आमदार देखील पोहोचले आहेत. अजित पवार यांच्यासोबत समर्थक आमदार हे व्यासपीठावर आहेत. पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. किती आमदार कोणासोबत आहेत, हे दोन्ही गटांच्या बैठकीतून स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादीचे 53 आमदार आहेत आणि पक्षांतर विरोधी कायद्यांतर्गत अपात्रता टाळण्यासाठी अजित पवार गटाला किमान 36 आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.

आमदारांना उपस्थित राहण्याचे 'व्हीप' : अजित पवार गटाने 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी सर्व आमदारांना उपस्थित राहण्याचे 'व्हीप' जारी केले. या एका ओळीच्या व्हीपमध्ये मुख्य सचेतक जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, शरद पवार यांनी 5 जुलै रोजी वाय.बी.चव्हाण सेंटर येथे दुपारी 1 वाजता बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व आमदारांची उपस्थिती अनिवार्य आहे. अजित पवार यांनी रविवारी इतर आठ आमदारांसह शिवसेना-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार यांनी आव्हाड यांना मुख्य व्हीप म्हणून नियुक्त केले.

  • #WATCH | Maharashtra's Deputy CM Ajit Pawar and leaders of his faction display a show of strength as they gather at MET Bandra in Mumbai for a meeting of NCP. pic.twitter.com/AXwBouBqFv

आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या अजित पवारांसह नऊ आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दाखल केली आहे. अजित पवार गटाच्या वतीने सुनील तटकरे बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. आजच्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा :

  1. Maharashtra Political Crisis Updates: शरद पवार व अजित पवारांच्या दोन ठिकाणी होणार बैठका, कुणाकडे किती आमदार आज होणार स्पष्ट
  2. Maharashtra Political Crisis : शरद पवार भेटीत काय बोलले? अमोल कोल्हेंनी खासदारकीचा राजीनामा द्यायचा निर्णय केला रद्द
  3. Maharashtra Political Crisis : सवता सुभा थाटल्यावर पवार काका पुतण्यांनी बोलावली बैठक, कोण कुणाच्या गोटात ते उद्या होणार स्पष्ट

Last Updated : Jul 5, 2023, 3:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.