नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसमधील नेत्यांची बैठक झाली. यावेळी राज्यात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठींबा देण्याच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रातील राजकीय स्थितीविषयी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. अद्याप शिवसेनेसोबत युती करण्याची आमची रणनीती नसल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. सरकार स्थापनेसाठी पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दर्शवावा, असे मत काही नेत्यांनी बैठकीत व्यक्त केल्याची माहिती आहे. या बैठकीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चौहान आणि माणिकराव ठाकरे आदींची उपस्थिती होती.
काँग्रेसची महाराष्ट्रात विरोधी पक्षाची भूमिका असणार आहे की, ते शिवसेनेला पाठिंबा देणार आहेत. याबाबत काँग्रेसने वेट ॲण्ड वॉच अशी भूमिका घेतली आहे.