ETV Bharat / state

राज्यात ३५० नवीन रुग्णांचे निदान; एकूण रुग्णसंख्या २६८४ तर २५९ रुग्ण घरी - राजेश टोपे पत्रकार परिषद

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४६ हजार ५८८ नमुन्यांपैकी ४२ हजार ८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत, तर २६८४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

maharashtra covid 19 patient
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Apr 14, 2020, 10:51 PM IST

मुंबई - राज्यात आज कोरोनाच्या ३५० नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या २६८४ झाली आहे. कोरोनाबाधित २५९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २२४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४६ हजार ५८८ नमुन्यांपैकी ४२ हजार ८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २६८४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

आजपर्यंत राज्यातून २५९ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ६७ हजार ७०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, ५,६४७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून, राज्यात या व्यक्तींपैकी ५० जण करोना बाधित आढळले आहेत.

लातूरमध्ये ८, यवतमाळ येथे ७, बुलढाणा जिल्ह्यात ६ , मुंबईत १४ तर प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड, नागपूर मनपा आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशिम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील ६ जण अहमदनगर येथे तर १ जण पिंपरी चिंचवड येथे करोना बाधित आढळले आहेत.

दरम्यान, आज राज्यात १८ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १७८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ११, पुण्यातील ४ तर अहमदनगर आणि औरंगाबाद मनपा येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. एक मृत्यू राज्याबाहेरील नागरिकाचा आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ७ महिला आहेत. त्यातील ५ जण हे ६० वर्षांवरील आहेत ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर दोघेजण ४० वर्षाखालील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या १८ जणांपैकी १३ रुग्णांमध्ये (७२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. या रुग्णांपैकी एकाला कर्करोग तर एकाला क्षयरोग होता.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील
मुंबई महानगरपालिका १७५६ (मृत्यू ११२)
ठाणे १०
ठाणे मनपा ९६ (मृत्यू ०३)
नवी मुंबई मनपा ६३ (मृत्यू ०३)
कल्याण डोंबवली मनपा ५० (मृत्यू ०२)
उल्हासनगर मनपा ०१
भिवंडी निजामपूर मनपा ०१
मीरा भाईंदर मनपा ४९ (मृत्यू ०२)
पालघर ०५ (मृत्यू ०१)
वसई विरार मनपा २९ (मृत्यू ०३)
रायगड ०५
पनवेल मनपा १० (मृत्यू ०१)
ठाणे मंडळ एकूण २०७५ (मृत्यू १२७)
नाशिक ०२
नाशिक मनपा ०२
मालेगाव मनपा ४२ (मृत्यू ०२)
अहमदनगर १० (मृत्यू ०१)
अहमदनगर मनपा १७
धुळे ०२ (मृत्यू ०१)
धुळे मनपा ००
जळगाव ०१
जळगाव मनपा ०१ (मृत्यू ०१)
नंदूरबार ००
नाशिक मंडळ एकूण ७७ (मृत्यू ०५)
पुणे १०
पुणे मनपा ३१० (मृत्यू ३४)
पिंपरी चिंचवड मनपा ३१ (मृत्यू ०१)
सोलापूर ००
सोलापूर मनपा ०१ (मृत्यु ०१)
सातारा ०६ (मृत्यू ०२)
पुणे मंडळ एकूण ३५८ (मृत्यू ३८)
कोल्हापूर ०१
कोल्हापूर मनपा ०५
सांगली २६
सिंधुदुर्ग ०१
रत्नागिरी ०६ (मृत्यू ०१)
कोल्हापूर मंडळ एकूण ३९(मृत्यू ०१)
औरंगाबाद ००
औरंगाबाद मनपा २३ (मृत्यू ०२)
जालना ०१
हिंगोली ०१
परभणी ००
परभणी मनपा ००
औरंगाबाद मंडळ एकूण २५(मृत्यू ०२)
लातूर ००
लातूर मनपा ०८
उस्मानाबाद ०४
बीड ०१
नांदेड ००
नांदेड मनपा ००
लातूर मंडळ एकूण १३
अकोला ००
अकोला मनपा १२
अमरावती ००
अमरावती मनपा ०६ (मृत्यू ०१)
यवतमाळ ०५
बुलढाणा १७ (मृत्यू ०१)
वाशिम ०१
अकोला मंडळ एकूण ४१ (मृत्यू ०२)
नागपूर ०५
नागपूर मनपा ३९ (मृत्यू ०१)
वर्धा ००
भंडारा ००
गोंदिया ०१
चंद्रपूर ००
चंद्रपूर मनपा ००
गडचिरोली ००
नागपूर मंडळ एकूण ४५(मृत्यू ०१)
इतर राज्ये ११ (मृत्यू ०२)
एकूण २६८४ (मृत्यू१७८)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात आज एकूण ५०५९ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी १८.३७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.