मुंबई: राज्यात गेल्या २४ तासात ६६० रुग्णांची तर २ मृत्यूंची नोंद झली आहे. ५३९ रुग्ण बरे झाले आहेत. मार्च २०२० पासून आतापर्यंत ८१ लाख ५५ हजार १८९ रुग्णांची तर १ लाख ४८ हजार ४७७ मृत्यूची नोंद झाली आहे. ८० लाख ६६५ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात ६०४७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यामधील मुंबईत १७०२, ठाणे १०३४, पुणे ७४०, नागपूर ८११, रायगड २५२, पालघर १७६, सांगली १७९, सोलापूर १२९, उस्मानाबाद १३० सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईत २६६ नवे रुग्ण: मुंबईत बुधवारी ३२०, गुरुवारी २७४, शुक्रवारी २८४ रुग्णांची नोंद झाली होती. आज त्यात आणखी घट होऊन २६६ रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आज एकाही मृत्यूंची नोंद झालेली नाही. मुंबईत १७०२ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत ११ लाख ६० हजार ३०९ रुग्णांची तर १९ हजार ७५३ मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्णालयात ११९ रुग्ण दाखल असून ४९ रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची गरज भासली आहे.
पावसाळ्यात कोरोनात वाढ: नांदेड जिल्ह्यात 26 ऑगस्ट रोजी कोविड रुग्णांची संख्या 5 हजारांवर गेली होती. तर यामध्ये 188 जणांचा मृत्यू झाला होता. त्यातच पावसाळ्यात शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांचे रुग्ण सापडत असतात. यावर्षीही पावसामुळे या साथीच्या आजारांनी चांगलेचे डोके वर काढले असून कोरोनाचे रुग्ण वाढण्यात याचा मोठा हातभार असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
तज्ज्ञांचे मत: कोविड आणि साथीच्या अनेक आजारांची लक्षणे सारखीच आहेत. त्यामुळे, कोविड आणि साथीचे आजार यामधील फरक ओळखणे प्राथमिक अवस्थेत तज्ज्ञांना अवघड होऊन बसले आहे. या संदर्भात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे औषध-वैद्यकशास्त्रचे विभाग प्रमुख डी. पी. भुरके म्हणाले, पावसाळ्यात व्हायरल फिव्हर, मलेरिया, डेंग्यू, टायफाईड, कॉलरासह अनेक आजार असतात. त्यामुळे कोरोना आणि साथीच्या आजारात फरक ओळ्खणे खूप कठीण आहे.
साथीच्या आजारानुसार उपचार: गतवर्षीप्रमाणे या पावसाळ्यातसुद्धा साथीच्या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. कोविड आणि इतर आजरांची लक्षणे सारखीच असल्यामुळे अगोदर कोविडची चाचणी करून घ्यावी. रुग्णाचा चाचणी अहवाल जर निगेटीव्ह आला तर, त्या रुग्णांच्या लक्षणानुसार उपचार करत असतो. तर, चिकून-गुनिया, टायफाईड, मलेरिया आदी आजारांची टेस्ट करून उपचार केल्या जातात. साथीच्या आजारांसह कोरोनाबाबत खबरदारी कशी घ्यावी ? सध्या कोविडची वाढती रुग्णसंख्या आणि इतर आजारांच्या बाबतीत खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या बाबतीत सोशल डिस्टंन्स, मास्क, स्वच्छता, सॅनिटायझर यांचा वापर, लक्षणे आढळल्यास तातडीने टेस्ट करून उपचार घेणे आवश्यक आहे. तसेच साथीच्या आजारांबाबतीतही नेहमीप्रमाणेच खबरदारी घेणे आवश्यक असून डासांची उत्पत्ती होऊ न देणे, स्वच्छता बाळगणे, पाणी गाळून व फिल्टर पाणी पिणे, ताजी फळं खाणे अशी प्राथमिक सतर्कता व काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉ. शंकरराव चव्हाण, शासकीय महाविद्यालयाचे औषध-वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. भुरके यांनी सांगितले.