मुंबई - कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. रविवारी (दि. ६ मार्च) राज्यात ३६२ कोरोना नव्या ( Maharashtra Corona Update ) रुग्णांची नोंद झाली आहे तर तिघांचा मृत्यू झाला आहे. आज एकूण ६८८ जणांनी कोरोना मात केली असून राज्यात आता ३ हजार ७०९ सक्रिय रुग्णांची ( Active Cases in Maharashtra ) संख्या आहे.
सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ८२ लाख ८१ हजार २५५ प्रयोगशाळा नमुनयाांपैकी ७८ लाख ६८ हजार ८१३ म्हणजेच १०.०५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २६ हजार २९१ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत तर ५८७ व्यक्ती सांस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत.
राज्यात ६१ ओमायक्रॉन रुग्ण - रविवारी (दि. ६ मार्च) राज्यात ६१ ओमायक्रॉन रुग्ण सापडले ( Omicron Variant ) आहेत. यापैकी पुणे महापालिका हद्दीत ४४, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत ८, पुणे ग्रामीण भागात ९ रुग्ण सापडले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण ५ हजार ७२६ ओमायक्रॉन रुग्ण बाधित झाले ( Omicron Patients in Maharashtra ) आहेत. यापैकी ४ हजार ७३३ रुग्णाांना चाचणी निगेटिव्ह आल्यानांतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.