ETV Bharat / state

#MAHACORONA LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर.. - corona maharashtra news

राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स
राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स
author img

By

Published : Jun 5, 2021, 6:46 AM IST

Updated : Jun 5, 2021, 1:01 PM IST

12:58 June 05

मुंबईत शुक्रवारी 88,527 लाभार्थ्यांचे लसीकरण

मुंबई - कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेनुसार सोमवार ते बुधवार वॉक इन पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. शुक्रवारी 88 हजार 527 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. तर 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 35 लाख 7 हजार 19 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

12:55 June 05

maharashtra unlock पाच स्तरांमध्ये निर्बंध शिथिल, वाचा राज्यातील अनलॉक कसा असणार?

पाच स्तरांमध्ये निर्बंध शिथिल,
पाच स्तरांमध्ये निर्बंध शिथिल,

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यात अक्षरश: थैमान घातले होते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. याचमुळे राज्यातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

10:24 June 05

सोमवारपासून राज्यात अनलॉकची घोषणा

सोमवारपासून राज्यात अनलॉकची घोषणा
सोमवारपासून राज्यात अनलॉकची घोषणा

मुंबई - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केला. मात्र, आता राज्यात अनेक ठिकाणी पॉझिटिव्हीटी रेट कमी होत असल्याने राज्य सरकारकडून अनलॉक करण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. "मिशन बिगिन अगेन"अंतर्गत राज्यातील निर्बंधासाठी स्तर निश्चित करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारकडून आदेश काढण्यात आला आहे. तीन जूनला आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली होती. मात्र, हा निर्णय विचाराधीन असल्याचे सांगत राज्य सरकारकडून त्यांच्या घोषणेला बगल देण्यात आली. यानंतर 4 जूनला रात्री उशिरा अधिसूचना काढत राज्य सरकारने सोमवारपासून राज्यात अनलॉकची घोषणा केली आहे.

09:24 June 05

रेड्डीज लॅबोरेटरीजकडून मुंबई महापालिकेला स्पुटनिक लसीचा जून अखेरीस पुरवठा

स्पुटनिक लस
स्पुटनिक लस

मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू केली. लसीचा तुटवडा जाणवू लागल्याने ग्लोबल टेंडरही काढण्यात आले. मात्र, पुरवठादारांकडे कायदेशीर कागदपत्रे नसल्याने टेंडर रद्द करण्यात आले. यादरम्यान स्पुटनिक लसीचे वितरक डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांच्यासमवेत महानगरपालिका प्रशासनाची चर्चा सुरु आहे. सुरुवातीला जूनच्या अखेरीस प्रायोगिक तत्त्वावर काही प्रमाणात लसीचा साठा दिला जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

06:36 June 05

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे? जाणून घ्या तज्ञांचे मत

नवी दिल्ली - कोरोना महामारीची दुसरी लाट संपूर्ण देशात पसरलेली आहे. यातच देशात कोरोनाची तिसरी लाट पसरणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. तिसरी लहर कधी येईल हे सांगता येणार नाही. परंतु तीचा सामना करण्यासाठी कोणत्या प्रकारची तयारी केली पाहिजे, याचा निश्चितपणे विचार केला जाऊ शकतो. कोरोनाचा जेव्हा प्रसार झाला. तेव्हा तो सर्वांसाठी नवा होता. त्यानंतर पहिली आणि दुसरी लाट देशात पसरली. पहिल्या लाटेच्यावेळी मास्क, सॅनिटायझर इत्यादींची कमतरता होती. तर दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन आणि रूग्णालयात बेडांची तीव्र कमतरता होती. यामुळे बऱ्याच लोकांना आपला जीव गमावावा लागला. तिसऱ्या लाटेत असे काय करावे, जेणेकरून लोकांचा जीव वाचेल हा प्रश्न उद्भवतो.

06:22 June 05

राज्यात नव्या 14 हजार 152 रुग्णांची नोंद

मुंबई - राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागले आहेत. दुसरी लाट ओसरु लागल्याचं चिन्ह दिसू लागली आहेत. दरदिवशी वाटणारी रुग्णसंख्या आता कमी झाली आहे. राज्यात आज नव्या 14 हजार 152 रुग्णांची नोंद झाली आहे. दुसरीकडे राज्यात 24 तासात 20 हजार 852 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 55 लाख 07 हजार 058 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 58 लाख 05 हजार 565 इतकी आहे.
 
Last Updated : Jun 5, 2021, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.