मुंबई - सिंधुदुर्गात नवे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. या महाविद्यालयात 100 विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय पुढीलप्रमाणे -
- सिंधुदुर्ग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित जिल्हा सामान्य रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करुन 500 रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यात येणार
- केंद्र शासनाने निश्चित केलेल्या दराव्यतिरिक्त धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर प्रति क्विंटल 700 रुपये (paddy procurement incentive support) देण्यास मान्यता