ETV Bharat / state

Breaking News : हंगामातील सर्वोच्च कमाल तापमान सांताक्रूझमध्ये - महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

Maharashtra Breaking news
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
author img

By

Published : Mar 10, 2023, 6:59 AM IST

Updated : Mar 12, 2023, 5:46 PM IST

17:45 March 12

वायू प्रदूषणाबाबत ७ दिवसांत अहवाल सादर करा - मुंबई पालिका आयुक्त

मुंबई - वायू प्रदूषणाबाबत ७ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. अहवालाच्या आधारे, १ एप्रिलपासून बीएमसी परिसरात धूळ नियंत्रणाच्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली जाईल, असे पालिकेने सांगितले आहे.

17:45 March 12

हंगामातील सर्वोच्च कमाल तापमान सांताक्रूझमध्ये

मुंबई - आज (12 मार्च 2023) सांताक्रूझ वेधशाळेने हंगामातील सर्वोच्च कमाल तापमानाची नोंद केली आहे. सांताक्रूझ येथे ३९.४ अंश सेल्सिअस आणि कुलाबा येथे ३५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांनी दिली आहे.

17:45 March 12

अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांची सायबर फसवणूक; गुन्हा दाखल

मुंबई - अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या नगमा यांची KYC सायबर फ्रॉड टोळीने ९९,९९८ रुपयांची फसवणूक केली होती. मुंबईच्या वांद्रे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम 420,419,66c आणि 66D अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

22:54 March 10

गडचिरोलीत तरुणाची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून केली हत्या; पोलीस गुप्तहेर असल्याचा संशय

गडचिरोली - भामरागड येथे साईनाथ नरोटी या २६ वर्षीय तरुणाची पोलीस गुप्तहेर असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. मृत हा गावापासून दूर स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता आणि होळीच्या दिवशी गावी आला होता.

18:01 March 10

गोरेगाव फिल्म सिटीमधील टीव्ही मालिकेच्या सेटला आग

मुंबई - गोरेगाव फिल्मसिटीमध्ये एका टीव्ही मालिकेच्या सेटवर आग लागली होती. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती पालिकेने दिली आहे.

16:33 March 10

किरीट सोमय्या अडचणीत.. अनिल परबांकडून विधानपरिषदेत हक्कभंगाचा प्रस्ताव..

विधान परिषदेत किरीट सोमय्या, मिलिंद बोरीकर यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव. वांद्रे येथील म्हाडाच्या बांधकाम प्रकरणी चुकीची माहिती देऊन म्हाडा करून मला नोटीस दिली. ते बांधकाम माझं नव्हतेच. 57 आणि 58 च्या इमारत मालकांना नोटीस देण्यात आली. जनमानसात माझी प्रतिमा मलीन करण्याचे काम करण्यात आली. नोटीस देण्यापूर्वी माजी मंत्री म्हणून कागदपत्रांची तपासणी करणे आवश्यक होती. त्यानंतर तपासणी केली असता ती जागा माझी नसल्याचे समोर आले म्हाडा तसं मला पत्र दिले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद बोर्डीकर यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडत आहे, असे आमदार अनिल परब म्हणाले.

15:29 March 10

कॉपी बहाबहाद्दरांची शिक्षकाला जिवे मारण्याची धमकी

जालना- परीक्षेत कॉपी करु देण्यासाठी चक्क शिक्षकानांच धमकावल्याचा प्रकार जालना जिल्ह्यातील सेवली येथील परीक्षा केंद्रावर समोर आला आहे. याबाबत तेथील केंद्रप्रमुख यांनी शिक्षण अधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केंद्रावर बंदोबस्त वाढवण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

14:24 March 10

पेन्शन योजनेबाबत घाईघाईने निर्णय घेऊन चालणार नाही-देवेंद्र फडणवीस

पेन्शन योजनेबाबत घाईघाईने निर्णय घेऊन चालणार नाही. पेन्शन योजनेसाठी सर्वांसाठी चर्चा करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितले.

14:04 March 10

लव्ह जिहाद शब्दावरून विधानसभेत गोंधळ सुरुच..

लव्ह जिहाद शब्दावरून विधानसभेत गोंधळ सुरुच आहे. आशिष शेलार आणि अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली आहे.

13:29 March 10

विरोधीपक्षनेते दानवेंनी उघडकीस आणला मोठा घोटाळा..

2014 ते 2016 मधील सरकारने फायलीवर सही केले तर त्यांनी प्रकाश मेहता यांनी निलंबित करण्यात आले होते. डिजिआयपीआरच्या माध्यमातून 500 कोटींचं मार्ग काम देण्यात आले. मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचे सांगत जाहिराती देण्यात आले आहेत. यानिमित्ताने अनियमितता झाल्याचे दिसते. येणाऱ्या काळात कार्यक्रम घेण्याचे प्रयत्न सुरू होतील. आताचे मुख्यमंत्री काय करतील माहित नाही. हा एक मोठा घोटाळा असून, यावर सरकार पांघरूण घालायचे काम करेल का? राज्य सरकारने यावरती कारवाई करायला हवी. 550 कोटी जनतेचे आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते दानवे केला.

13:23 March 10

लव्ह जिहादवरून सभागृहात गदारोळ

एक लाख प्रकरणे कुठून आणली असा सावल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मंगलप्रभात लोढा यांनी माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे.

13:04 March 10

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा.. पोलिसांवर गंभीर ताशेरे

मुंबई : पोलिसांना खडसावत मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत हसन मुश्रीफ यांना दिलासा दिलेला आहे. तसेच त्यांची अटक देखील टळलेली आहे. त्यांच्या संदर्भात कोणतेही चार्जशीट दाखल केले जाणार नाही याबद्दलचे आदेश देखील मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठाने नुकतेच दिलेले आहे.

12:52 March 10

आदिवासी मुलांची होतेय विक्री.. कारवाई करण्याची मागणी

आमदार शशिकांत शिंदे: आदिवासी मुलं विकण्याचा प्रकार समोर आला आहे. मुलांची विक्री होत असेल तर या संदर्भातील कायदा आजच व्हायला हवा आणि त्यावरती कारवाई व्हावी, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली.

विरोधीपक्षनेते अंबादास दानवे: पारनेर मध्ये एका मुलीला तीन चार हजाराला विकले होते. जनावर पाळण्यासाठी तिला पाठवण्यात आले. मध्यरात्री दोन-तीन वाजता मुलीला आई-वडिलांच्या दारात टाकून दिली. नाशिक मधील इगतपुरी घोटीच्या जवळ ही घटना घडली. आदिवासी पाड्यावर जाऊन लहान मुलं कुठे जात असेल तर त्याची तपासणी व्हावी. वेठबिगारी साठी बरेच लोक त्याचाच फायदा घेऊन येतात. त्याच्या सर्व्हे व्हावा आदिवासी विभागणी योग्य ती कारवाई करावी.

12:30 March 10

सिडकोच्या कंत्राटात घोटाळा? लक्ष घालण्याची अजित पवारांची मागणी

अजित पवार: सिडकोने लॉटरी प्रक्रिया खाजगी कंपनीच्या मार्फत राबवली. खाजगी कंपन्यांना मार्केटिंगचा ठेका दिला. पाच वर्षात 68 हजार घरे निर्माण करणार आहेत. 699 कोटी रुपये त्या कंपनीला मिळणार आहेत. सिडकोने त्यांच्याकडून फक्त सहा कोटी नऊ लाख रुपये मिळणार आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची स्थानिकांची भावना आहे. संदर्भात सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली.

एमपीएससी गट ब परीक्षेसाठी आपल्यालाही तरुण भेटले होते. यूपीएससी या वेळेस नवीन वर्षाच्या नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र स्वीकारले जातात. मुलांचे नुकसान होणार नाही यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असेही पवार म्हणाले.

12:26 March 10

शेतकऱ्यांच्या जातीचा उल्लेख डीबीटी पोर्टलवरून वगळा, केंद्र सरकारला कळवणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डीबीटी पोर्टल वर जातीचा उल्लेख झाला आहे. तो वगळा असे आम्ही केंद्राला कळवत आहोत. शेतकऱ्यांच्या बाबतीत काल सकारात्मक निर्णय घेतले तुमचा भ्रमाचा भोपळा असल्यामुळे तुम्ही काहीही बोलता, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाना पटोलेंना उत्तर दिले.

12:23 March 10

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची जात का विचारता.. नाना पटोले आक्रमक

खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची जात विचारली जात असेल तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे: नाना पटोले आक्रमक

'राईचा पर्वत कसे काय म्हणाले' या शब्दावरून नाना पटोले आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात बाचाबाची.

12:15 March 10

खरेदी करण्यासाठी जात सांगावी लावण्याची वेळ, सभागृहात विरोधी पक्षनेते आक्रमक

खरेदी करण्यासाठी जात सांगावी लावण्याची वेळ आल्यावरून विरोधी पक्षांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

12:14 March 10

विरोधी पक्षनेत्यांचे भोपळे हातात धरून विधान भवनाबाहेर आंदोलन

विरोधी पक्षनेत्यांनी भोपळे हातात धरून विधान भवनाबाहेर आंदोलन केले. राज्याच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने जनतेला कोणताही दिलासा दिला नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला.

11:28 March 10

भरधाव वेगात जाणारा ट्रक महामार्गावरून थेट खाली कोसळला, एक जण जागीच ठार

समृद्धी महामार्गावरून भरधाव वेगात जाणारा ट्रक महामार्गावरून थेट खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी आहे. अमरावती जिल्ह्यात धामणगावरेल्वे तालुक्यातील शेंदुर्जना लगत निमगव्हाण या गावाजवळ हा भीषण अपघात घडला.

11:10 March 10

शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना ईडीने घेतले ताब्यात

सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. ही माहिती भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी दिली आहे.

10:51 March 10

खासगी शाळेला लागून असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग

ठाण्यातील मुंब्रा परिसरात असलेल्या एका खासगी शाळेला लागून असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी तैनात. कोणतीही जीवितहानी झाली नाही: ठाणे महानगरपालिका

10:28 March 10

भूमिगत वीज तारांना मोठी आग, एका व्यक्तीचा मृत्यू

ठाणे शहरातील शिल फाटा परिसरात शुक्रवारी सकाळी भूमिगत वीज तारांना मोठी आग लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

10:08 March 10

राज ठाकरेंच्या वाट्याला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही-संजय राऊत

शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा. ईडी खोक्यांचा वापर करून सरकार पाडले. राज ठाकरेंच्या वाट्याला जाण्याएवढा त्यांचा पक्ष मोठा नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी मनसेला लगावला आहे.

09:45 March 10

शिवजयंतीची ज्योत आणणाऱ्या टेम्पोला कंटेनरने धडक मोठा अपघात

शिवजयंतीची ज्योत आणणाऱ्या टेम्पोला कंटेनरने धडक दिल्यामुळे मोठा आपघात झाला आहे पवनांमध्ये २० पेशंट आणलेले आहेत.

08:35 March 10

अफगाणिस्तानात ४.१ तीव्रतेचा भूकंप

आज सकाळी फैजाबाद, अफगाणिस्तानच्या दक्षिणेस 101 किमी अंतरावर रिश्टर स्केलवर 4.1 तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याची नोंद केली आहे.

08:30 March 10

सुदर्शन पटनायक यांनी अभिनेते सतीश कौशिक यांना वाहिली श्रद्धांजली

पुरी येथील वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी अभिनेते सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वाळूवर त्यांचे पोर्ट्रेट बनवले

07:02 March 10

10 वर्षीय मुलीचे धाडस, चेन स्नॅचरचा प्रयत्न हाणून पाडला!

पुणे शहरात एका 10 वर्षीय मुलीने आजीची चेन हिसकावण्याचा चेन स्नॅचरचा प्रयत्न हाणून पाडला. ही घटना 25 फेब्रुवारी रोजी घडली आणि घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काल एफआयआर दाखल करण्यात आला.

07:00 March 10

सोन्याच्या चोरीप्रकरणी दागिने बनवणाऱ्या युनिटच्या दोन कर्मचाऱ्यांना पश्चिम बंगालमधून अटक

दागिने बनविणाऱ्या युनिटच्या दोन कर्मचाऱ्यांना मुंबई पोलिसांनी गुरुवारी पश्चिम बंगालमधून अटक केली. त्यांच्या कामाच्या ठिकाणाहून सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे.

06:30 March 10

Maharashtra Breaking News: गद्दारांनी आश्वासन दिल्याने कोणीही विश्वास ठेवणार नाही-आदित्य ठाकरे

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने गुरुवारी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांनी टीका केली आहे. गद्दारांनी आश्वासन दिल्याने कोणीही विश्वास ठेवणार नाही, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Last Updated : Mar 12, 2023, 5:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.